
Solapur News : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी येणाऱ्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. मात्र जिल्ह्यातील तेरा कारखानदारांनी शेतकऱ्यांचे १३४ कोटी रुपये थकवले आहेत. आपल्या घामाच्या पैशासाठी शेतकऱ्यांना कारखानदारांच्या कार्यालयापर्यंत चपला झिजवण्याची वेळ येत आहे. कारखानदार मात्र ऊस कायद्यातील त्रुटीचा आधार घेत वेळ मारून नेत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या ऊस कायद्यानुसार शेतकऱ्यांची उसाची रक्कम पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्याला देणे बंधनकारक असताना सहा महिने उलटले तरी अद्याप जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची रक्कम मिळालेली नाही. कारखानदारांच्या या भूमिकेमुळे कित्येक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
साखर कायद्यानुसार वेळेत उसाची रक्कम न दिल्यास कारखानदाराची मालमत्ता ताब्यात घेऊन तिच्या विक्रीतून शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम अदा करावी अशी तरतूद आहे. मात्र ही कारवाई वेळ खाऊ व कित्येक वेळा राजकीय दबावापोटी पूर्ण होत नाही. याचाच गैरफायदा जिल्ह्यातील साखर कारखानदार घेत आहेत. हंगामाच्या
सुरुवातीला पहिल्या टप्प्यातील काही शेतकऱ्यांच्या उसाच्या रकमा दिल्या जातात. नंतर मात्र शेतकऱ्यांच्या रकमा देण्यास टाळाटाळ केली जाते. नवीन उसाचा हंगाम सुरू होण्यास जवळपास पाच महिन्यांचा कालावधी राहिला आहे. असे असतानाही जिल्ह्यातील तेरा कारखानदारांनी अद्याप शेतकऱ्यांची दीडशे कोटी रुपयांची रक्कम दिली नाही.
या कारखान्यांनी दिली पूर्ण रक्कम
इटोपियन शुगर, सहकार महर्षी, लोकनेते, सासवड माळीनगर, लोकमंगल (बीबी दारफळ), विठ्ठल कार्पोरेशन (म्हैसगाव), जकराया, बबनराव शिंदे (तुर्क पिंपरी), संत दामाजी, विठ्ठलराव शिंदे (पिंपळनेर), ओंकार (चांदापुरी), ओंकार (तडवळे), संत कुर्मदास, आष्टी शुगर, सीताराम महाराज, येडेश्वरी शुगर,शंकर सहकारी, बबनराव शिंदे (करकंब), लोकमंगल (भंडारकवठे).
या कारखान्यांनी थकवली शेतकऱ्यांची रक्कम
जय हिंद शुगर ३० कोटी ७८ लाख
इंद्रेश्वर (उपळाई) २२ कोटी ४५ लाख
सिद्धेश्वर सहकारी २३कोटी ८० लाख
सिद्धनाथ १० कोटी ८८लाख
गोकुळ शुगर १७ कोटी २१ लाख
पांडुरंग ५ कोटी ८६ लाख
मातोश्री शुगर ५ कोटी ३८ लाख
सहकार शिरोमणी ४ कोटी ४० लाख
अवताडे शुगर ५ कोटी २९ लाख
भैरवनाथ (आलेगाव) २ कोटी ९५ लाख
विठ्ठल सहकारी २ कोटी ८७ लाख
धाराशिव शुगर (सांगोला) ३८लाख
भैरवनाथ (लवंगी) १ कोटी २७ लाख
भीमा सहकारी १ कोटी २६ लाख
एकूण रक्कम १३४ कोटी ४२ लाख
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.