Natural Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming : साताऱ्यातील ५४ गटांची नैसर्गिक शेतीसाठी निवड

Organic Farming : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन ही महत्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Satara News : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन ही महत्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहेत.

यामध्ये दहा तालुक्यांतून ५४ गटांची निवड करण्यात आली आहे. या गटाचे क्षेत्र दोन हजार ७०० हेक्टर असून नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, बाह्य निविष्ठा खरेदी न करणे, निसर्गावर आधारित शाश्वत शेती प्रणाली विकसित करणे, मातीचे आरोग्य आणि सुपीकता पुनरुज्जीवित करणे, पाण्याची गुणवत्ता वाढविणे, जैवविविधता जतन, शेतकरी त्यांचे कुटुंब आणि ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्न पुरविणे हे मुख्य उद्दिष्ट या योजनेचे आहे.

या योजनेस केंद्र शासनाचा ६० तर राज्य सरकारचा ४० टक्के निधी मंजूर आहे. जिल्ह्यात ५० हेक्टर क्षेत्राचा एक गट तयार करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील १० तालुक्यांत ५४ गट निवडण्यात आले आहेत.

राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन ही महत्वकांक्षी योजना राबविण्यात येत असून या अंतर्गत गटांची निवड करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क करावा.
- अजय शेंडे, प्रकल्प संचालक, आत्मा (कृषी विभाग)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Health Scheme: मोफत उपचार असताना रुग्णालयांनी पैसे उकळले, ३३८ प्रकरणी कारवाई, आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

IAS Varsha Meena: उष्मालाट दक्षतेबाबत व्यापक जनजागृती करा : जिल्हाधिकारी मीना

Carbon Sequestration: कर्ब साठवणूक : कार्बन अर्थव्यवस्थेची संधी

LPG Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’

Ganeshrao Deshmukh: ग्रामीण अर्थकारण बळकटीशिवाय विकसित भारत संकल्पना अपूर्ण : गणेशराव देशमुख

SCROLL FOR NEXT