Natural Farming : मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषीसखींना नैसर्गिक शेतीवर प्रशिक्षण

Mohol KVK : मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्रात खास महिलांसाठी राष्ट्रीय शेती अभियानातंर्गत नैसर्गिक शेतीचे पाच दिवसीय प्रशिक्षण नुकतचे पार पडले.
Natural Farming
Natural Farming Agrowon
Published on
Updated on

Solapur News : मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्रात खास महिलांसाठी राष्ट्रीय शेती अभियानातंर्गत नैसर्गिक शेतीचे पाच दिवसीय प्रशिक्षण नुकतचे पार पडले. कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण पार पडले.

करमाळा, अक्कलकोट, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ आणि माढा, सांगोला तालुक्यांमधील कृषीसखी यामध्ये सहभागी झाल्या. आत्माचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॅा.तानाजी वळकुंडे, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, योगेश पवार, सुहास ढवळे, नोडल अधिकारी, विषयविशेषज्ञ काजल म्हात्रे, दिनेश क्षीरसागर, पंकज मडावी, सूरज मिसाळ, स्वाती कदम आदी उपस्थित होते.

Natural Farming
Natural Farming Benefits: नैसर्गिक पद्धतीने शाश्‍वत शेती फायदेशीर

यावेळी श्री. खोत म्हणाले, की नैसर्गिक शेतीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शेतीचा खर्च कमी करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे संसाधनांचे संवर्धन करणे, माती-पर्यावरण आणि अन्न यांचे आरोग्य सुनिश्चित करणे आणि शाश्वत कृषी पद्धतींनी प्रोत्साहन देणे हे आहे, असे सांगितले. डॉ. वाळकुंडे यांनी प्रास्ताविक केले.

Natural Farming
Natural Farming : नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगद्वारे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन

तांत्रिक सत्राद्वारे मार्गदर्शन

तांत्रिक सत्रामध्ये डॉ. पंकज मडावी यांनी जैविक कीड व रोग नियंत्रण याबद्दल उपस्थित सखींना सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. स्वाती कदम यांनी बीज प्रक्रिया कशी करावी याबाबत तूर पिकासाठीचे प्रात्यक्षिक दाखवले. विशाल वैरागर यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टींचे सखोल मार्गदर्शन केले.

हवामान शास्त्रज्ञ डॉ. सूरज मिसाळ यांनी देखील बदलते हवामान व त्यानुसार करण्यात येणारे पिकांमधील कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. नोडल अधिकारी आणि विषय विशेषज्ञ श्रीमती काजल म्हात्रे यांनी मातीचा नमुना कसा काढावा. तसेच जमिनीच्या आरोग्याचे व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. दिनेश क्षीरसागर यांनी सेंद्रिय शेती प्रमाणीकरण याबाबत सविस्तर माहिती दिली. पांडुरंग बोबडे यांनी दहा ड्रम तंत्रज्ञानाची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com