Narayan Rane Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election Result : नारायण राणेंनी रोखली विनायक राऊतांची हॅटट्रिक

Result Update : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी २३ व्या फेरीअखेर ५१८९४ मतांनी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

Team Agrowon

Ratnagiri News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी २३ व्या फेरीअखेर ५१८९४ मतांनी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. सुरुवातीपासूनच राणे यांनी आघाडी घेतली होती. तर तिसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांना मताधिक्य मिळाले होते. मात्र त्यानंतर राणेंनी प्रत्येक फेरीत मताधिक्य घेतले.

नारायण राणे यांना निर्णायक मताधिक्य मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यानी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोनही जिल्ह्यांमध्ये जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. राणेंच्या विजयामुळे विनायक राऊत यांनी विजयाची हॅटट्रिक करण्याचे बाळगलेले स्वप्न भंगले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये चुरशीची लढत होती. भाजप आणि शिवसेने (उबाठा) करिता ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. दोन्ही पक्षांची भविष्यातील राजकीय दिशा ठरविणारी असल्यामुळे प्रचंड ताकदीने ही निवडणूक लढविली गेली.

एकीकडे ही निवडणूक वरकरणी राणे विरुद्ध राऊत असली तर प्रत्यक्षात भाजप विरुद्ध ठाकरे अशी कडवी झुंज होती. परंतु भाजप आणि राणेंच्या संघटनात्मक बांधणीपुढे श्री. राऊत आणि ठाकरे शिवसेनेची ताकद कमजोर ठरली. एका फेरीचा अपवाद वगळता प्रत्येक फेरीगणीक श्री. राणेंना मताधिक्य मिळत गेले. तेवीसाच्या फेरीनंतर राणेंना ५१ हजार ८९४ मतांचे मताधिक्य मिळाले. श्री. राणेंना ४ लाख ३३ हजार ३०० तर श्री. राऊत यांना ३ लाख ८१ हजार ४०६ मते मिळाली.

या निवडणुकीत काजू बी दराचा विषय लक्षवेधी ठरला होता. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर आयात होणाऱ्या काजू बीवरून आफ्रिकेतील मते आयात करा, असे फलक काजू उत्पादकांनी लावले होते. परंतु हा मुद्दा तितकासा प्रभावी ठरलेला नाही. याशिवाय या निवडणुकीत लव्ह जिहाद, संविधान हे मुद्दे महत्त्वपूर्ण ठरले.

२३ व्या फेरीअखेरी पडलेली मते

मतदारसंघ : रत्नागिरी-सिंधुर्दुग

पक्ष उमेदवार पडलेली मते

भाजप नारायण राणे ४,२२,३००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage: बळीराजाला आर्थिक चणचण

Dharashiv Farmer News: हमीभाव मिळविण्यासाठीही शेतकऱ्यांचे हाल

Sugarcane Cultivation: देवणी तालुक्यात ऊस लागवडीला वेग

Rabi Crop Sowing: सांगली जिल्ह्यात रब्बीचा पेरा पोहोचला २७ टक्क्यांवर

Water Supply: टँकरची समस्या खानदेशात दूर

SCROLL FOR NEXT