Vishal Patil
Vishal PatilAgrowon

Sangli Loksabha Result 2024 : सांगली लोकसभेत ‘विशाल’ विजय

Sangli Assembly : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सांगली लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार विशाल प्रकाशबापू पाटील हे विजयी झाले.

Sangli News : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सांगली लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार विशाल प्रकाशबापू पाटील हे विजयी झाले. आठव्या फेरीअखेर विशाल पाटील यांना २,०४, ७७४ इतकी मते मिळाली आहेत.

Vishal Patil
Loksabha Election Result 2024 : जळगाव, रावेर मतदार संघांत भाजपने गड राखला

भाजपचे संजय पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना त्यांनी आस्मान दाखवले. पाटील यांची हॅट्‍ट्रिक हुकली. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अपक्ष विशाल पाटील यांच्या विजयानंतर सांगली लोकसभा मतदार संघात जल्लोष करण्यात आला.

Vishal Patil
Election Result 2024 : उत्तर प्रदेशात धावली ‘सप’ची सायकल

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे संजय पाटील, महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उबाठा) चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी लढत झाली. मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे मंगळवारी (ता. ८) सकाळी वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. टपाली मतांपासन आघाडी घेत विशाल पाटील यांना आघाडी मिळाली.

विधानसभानिहाय झालेल्या मतमोजणीत सहाही मतदार संघात विशाल पाटील यांनी आघाडी कायम ठेवली. सातव्या फेरीचा अपवाद वगळता ते आघाडीवर राहिले. भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना २४ व्या फेरीअखेर ४,६६,७२६ मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना ५९,७९२ हजार इतकी मते मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com