Nandurbar Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Update : पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी!

Indian Agriculture : दिवसभर सोसायट्याचा वारा... अन् नुसताच धुरळा... निम्मा जून संपला तरी पावसाचा टिपूसही नाही

Team Agrowon

Nandurbar News : दिवसभर सोसायट्याचा वारा... अन् नुसताच धुरळा... निम्मा जून संपला तरी पावसाचा टिपूसही नाही. सर्वत्र पेरण्या खोळंबल्या असून, काळजीने व्याकूळ झालेला बळीराजाच्या तोंडी आता गायक प्रल्हाद शिंदे यांचे ‘पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी! शेत माझं लय तान्हीलं, चातकावाणी...’ या गीतातील ओवीप्रमाणे बळीराजासह सर्वसामान्य नागरिक पावसासाठी आळवणी करीत आहे.

जून महिन्याचा पहिला पंधरवडा संपला तरी खानदेशात अद्यापही पावसाची चिन्हे दिसून येत नाही. त्यातच सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने बागायती क्षेत्रही धोक्यात आले आहे. दर वर्षी तालुक्यात १५ जूनपर्यंत मॉन्सूनपूर्व पावसाचे आगमन होऊन शेतकरी पेरणीपूर्व मशागत पूर्ण करून घेतो मात्र यंदा जूनची १९ तारीख आली तरी पावसाची चिन्हे दिसत नाहीत.

बागायती क्षेत्रही ऑक्सिजनवरच

दरम्यान, खानदेशात मोठ्या प्रमाणावर बागायती शेती केली जाते. त्यात बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस, केळी, पपई आदी पिकांची लागवड केली आहे. केळी, पपईची महागडी रोपे जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

त्यातच विजेचा होणारा लपंडाव यामुळे पिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याने पिकेही माना टाकत आहेत. निदान वीज वितरण कंपनीने तरी वीजपुरवठ्यात सातत्य ठेवून सुरळीत ठेवावा, अशी मागणी कायम आहे.

सिंचन प्रकल्पांत अल्प साठा

खानदेशातील सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प साठा शिल्लक राहिला आहे. हा साठा सुमारे २१ टक्केच आहे. जळगावमधील गिरणा, हतनूर, वाघूर, धुळ्यातील पांझरा, अनेक, नंदुरबारातील सुसरी, दरा आदी प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठा काही दिवसात संपुष्टात येईल, अशी स्थिती आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत हवालदिल झाला आहे.

सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरलेले सुसरी प्रकल्प व लोंढरे धरणात अवघा २० टक्के साठा शिल्लक असल्याने मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहादा (जि. नंदुरबार) तालुक्याच्या सीमेवर असलेले दरा धरण, दुधखेडा, काकरदा, लोंढरे आदींसह लहान-मोठ्या प्रकल्पात शिल्लक कमी होत आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून दिवसभर सोसायट्याचे वारे वाहत आहे. त्यासोबत जमिनीवरील धुरळा हवेत उडत आहे. त्यामुळे शेतामध्ये काम करणारे शेतकरी वाहनचालक धुरळा डोळ्यात जाऊन त्रस्त झाले आहेत. मोकळ्या वाऱ्याने पाऊस लांबण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT