Nandini Milk Karnataka agrowon
ॲग्रो विशेष

Nandini Milk Karnataka : नंदिनी दुधात प्रतिलिटर ५० मिलीची वाढ तर किंमत वाढविली दोन रुपयांनी

Nandini Milk : कर्नाटक दूध महामंडळाने ५० मिली अतिरिक्त दूध देत नंदिनी दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे.

sandeep Shirguppe

Karnataka Milk Sangh : कर्नाटक दूध महामंडळाने ५० मिली अतिरिक्त दूध देत नंदिनी दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. कालपासून (ता. २६) ही दरवाढ लागू होणार करण्यात आली आहे. मात्र, नंदिनी दुधाच्या दरात वाढ न केल्याची माहिती केएमएफचे अध्यक्ष भीमा नायक यांनी माहिती दिली.

नंदिनी दूध संस्थेचे अध्यक्ष नायक यांनी दिलेल्या प्रसिद्धपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, ‘‘एक लिटर दुधाच्या पिशवीत ५० मिली अधिक दूध देण्यात येणार आहे. अधिकच्या ५० मिलिलिटर दुधाची किंमत दोन रुपये १० पैसे होते. अर्धा व एक लिटर नंदिनी दुधाच्या पॅकेटमध्ये अतिरिक्त ५० मिली दूध अतिरिक्त मिळणार आहे. दुधाच्या दरात प्रत्यक्ष वाढ झालेली नाही. सध्या नंदिनी ब्लू पॅकेट दुधाची किंमत ४२ रुपये आहे. त्यामुळे उद्यापासून ते ४४ रुपये होईल. अर्धा लिटर दुधाची किंमत २२ रुपयांवरून २४ रुपये होईल. अर्धा लिटर दुधाच्या पाकीटातही ५० मिली अधिक दूध मिळेल.

दही आणि इतर उत्पादनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. सर्व दूध संघांमध्ये दुधाचा साठा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याचा साठा एक कोटी लिटरच्या जवळपास आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना एक लिटर व अर्धा लिटर पाकिटात ५० मिली अतिरिक्त दूध देण्याचे ठरले आणि या अतिरिक्त दुधाची किंमत म्हणून दोन रुपयांनी वाढ केली आहे.

प्रति लिटर नंदिनी दूधात ५० मिली अतिरिक्त मिळणार ही दरवाढ उद्यापासून लागू होणार आहे. महामंडळाकडे जुन्या किमतीच्या छापील दुधाच्या पाकिटांचा साठा असून जोपर्यंत हा साठा संपत नाही, तोपर्यंत जुन्याच छापील पाकिटांमध्ये दुधाचा पुरवठा केला जाईल. यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे असे सांगण्यात आले आहे.’’

दुधाचे दर वाढवलेले नाहीत : मुख्यमंत्री

दुधाचे उत्पादन वाढल्याने नंदिनी दुधाचे प्रति पॅकेटमध्ये ५० मिलीलीटर दूध देण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जादा दुधासाठी दोन रुपये दर ठरवला आहे. मात्र, दुधाच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याचे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘अर्धा लिटर दुधाच्या पॅकेटमध्ये ५५० मिली आणि एका लिटरच्या पॅकेटमध्ये १,०५० मिली दूध मिळणार आहे. दूध संकलन केंद्रांमध्ये शेतकऱ्यांनी आणलेले अतिरिक्त दूध कोणत्याही कारणाने नाकारू नये, या चांगल्या हेतूने केएमएफ संघटनेने पॅकेटमधील दुधाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी कर्नाटकात दूध उत्पादनात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दैनंदिन सरासरी ९० लाख लिटर उत्पादन वाढून ते सरासरी ९९ लाख लिटर झाले आहे. अशाप्रकारे उत्पादित अतिरिक्त दूध शेतकऱ्यांकडून खरेदी केले पाहिजे. आतापर्यंत एक हजार मिली दुधाची किंमत ४२ रुपये आणि ५०० ​​मिली दुधाची किंमत २२ रुपये होती. यापुढे १,०५० मिली आणि ५५० मिली दुधाची पाकिटे अनुक्रमे ४४ आणि २४ रुपये दराने विकली जातील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT