Parliament Session 2024 : सरकारने खरीप पिकांच्या हमीभावात विक्रमी वाढ केली : राष्ट्रपती मुर्मू 

President Droupadi Murmu Address : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या नवीन इमारतीत दोन्ही सभागृहांना संबोधित केले. 
Parliament Session 2024
Parliament Session 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : सरकारच्या नवीन कार्यकाळाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत २० हजार कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. सरकारने खरीप पिकांच्या हमीभावात विक्रमी वाढ केली, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती मुर्मू गुरूवारी (ता.२७) संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करत होत्या. यावेळी त्यांनी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन करताना निवडणूक आयोगाचेही अभिनंदन केले.  तसेच जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकारवर विश्वास दाखवला असून माझ्या सरकारचा सातत्यावर विश्वास असल्याचेही राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या. 

पुढे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, आजचा भारत सध्याच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या कृषी व्यवस्थेत बदल करतोय. जगामध्ये सेंद्रिय उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत असून देशाच्या शेतकऱ्यांकडे मागणी पूर्ण करण्याची पूर्ण क्षमता आहे.  

Parliament Session 2024
Droupadi Murmu : संघर्ष करून पुढे जा; समाजबांधवांचाही विकास करा

सरकार शेती आणि संबंधित उत्पादनांची पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी काम करत आहे. भारताच्या विकासाचा वेग अधिक गतीमान केले जाईल. तर शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी अर्थसंकल्पात ऐतिहासिक पावले उचलली जातील असेही राष्ट्रपती म्हणाल्या. 

Parliament Session 2024
President Droupadi Murmu : विकासात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची ः राष्ट्रपती मुर्मू

यावेळी संविधानावर अनेकदा हल्ले झाले. आणीबाणीच्या काळात देशात हाहाकार माजल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात केली. यावेळी त्या म्हणाल्या, सशक्त भारतासाठी आपल्या सैन्यात आधुनिकता आवश्यक आहे. युद्धाच्या परिस्थितीत सर्वोत्तम होण्यासाठी, सैन्यात सुधारणा करण्याची प्रक्रिया चालू ठेवली पाहिजे. हाच विचार करून माझ्या सरकारने गेल्या १० वर्षांत अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. गेल्या दशकात आपली संरक्षण निर्यात १८ पटीने वाढून २१ हजार कोटी रुपये झाली आहे.

तर राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात पेपरफुटीचा उल्लेख करताना म्हणाल्या, 'पेपर लीकच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यापूर्वीही अनेक राज्यात पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. पक्षीय राजकारणावर उठून या प्रश्नावर देशव्यापी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com