Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : नांदेडला १०४ प्रकल्पांत ६७ टक्के पाणीसाठा

Team Agrowon

Nanded News : यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांत सध्या ४८८.४३ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी ६७.०८ टक्के एवढी आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेत ६६४.०१ दलघमी म्हणजेच ९१.२० टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा असून, आगामी काळात उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी आतापासूनच पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

जिल्ह्यात गोदावरी नदीसह मन्याड, मांजरा, पैनगंगा, आसना, लेंडीसह इतर नद्या आहेत. यंदाच्या वर्षी जून महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे काही प्रकल्पात पाणीसाठा कमी झाला आहे.

यंदाची पाण्याची परिस्थिती पाहून जिल्ह्यातील आठ तालुक्यातील २५ महसुली मंडलात दुष्काळसदृश परिस्थिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घोषित केली आहे. यामध्ये कंधार तालुक्यातील सहा, नांदेडला पाच, नायगाव, मुखेड आणि लोहा तालुक्यांतील प्रत्येकी तीन, हदगाव, हिमायतनगरमधील प्रत्येकी दोन, तर देगलूर तालुक्यातील एका महसूल मंडलाचा समावेश आहे.

जिल्ह्यात दोन मोठे, नऊ मध्यम, नऊ उच्च पातळी बंधारे, ८० लघू प्रकल्प आणि चार कोल्हापुरी बंधारे असे एकूण १०४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पात सध्या पूर्णजल क्षमता ५६७ दलघमी आहे, तर उपयुक्त पाणीसाठा ४८८.४३ दलघमी आहे. त्याची टक्केवारी ६७.०८ टक्के आहे. त्याचबरोबर जिल्ह्यालगत असलेल्या येलदरी, सिद्धेश्‍वर आणि ऊर्ध्व पैनगंगा इसापूर प्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे.

मात्र आगामी काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन त्यानुसार पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद, पाटबंधारे, जलसंपदा विभागाला आतापासूनच करावे लागणार आहे. विष्णुपुरीतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट नांदेड शहरासह इतर गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठ्यात मात्र झपाट्याने घट होत आहे.

त्यामुळे त्याची विशेष काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. गेल्या महिन्यात ता. १२ ऑक्टोबर रोजी विष्णुपुरी प्रकल्पात ८०.७९ दलघमी म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा होता. आता ता. २३ नोव्हेंबर रोजी ५७.८९ दलघमी म्हणजेच ७१.६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे तब्बल २८ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा

प्रकल्पाचे नाव उपयुक्त पाणी साठा टक्केवारी

मानार ८६.९१ ६२.८८

विष्णुपुरी ५७.८९ ७१.६५

मध्यम प्रकल्प (नऊ) ७६.७८ ५५.२१

उच्च पातळी बंधारे (नऊ) ११४.९६ ६०.५७

लघू प्रकल्प (८०) १५१.०४ ८७.४१

कोल्हापुरी बंधारे (चार) ०.८५ ११.४३

एकूण (१०४) ४८८.४३ ६७.०८

जिल्ह्यालगत प्रकल्पातील पाणीसाठा

येलदरी (हिंगोली) ४७८.३२ ५९.०७

सिद्धेश्‍वर (हिंगोली) ७४.३९ ९१.८९

इसापूर (यवतमाळ) ७६७.३३ ७९.५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT