Koyna Dam water storage : कोयनेच्या पाणी साठ्यात घट, विजनिर्मीतीला अडथळे, भारनियमन वाढण्याची शक्यता

Koyna Dam : पश्चिम महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातही पाणीसाठा कमी होत चालला आहे.
Koyna Dam water storage
Koyna Dam water storageagrowon

Koyna Dam Water Shortage : यंदा पाऊसमान कमी झाल्याने राज्यातील बऱ्याच धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातही पाणीसाठा कमी होत चालला आहे. दरम्यान कोयना धरणामध्ये कमी प्रमाणात साठा उपलब्ध झाल्याने सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात कपात प्रस्तावित करण्यात आली आहे.

सिंचनाच्या पाणीवापरात २.८६ टीएमसी व वीजनिर्मितीच्या पाणी वापरात ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. ही कपात मान्य झाली आणि उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्यास चालू वर्षी कमी पर्जन्यमानामुळे धरणामध्ये कमी प्रमाणात साठा उपलब्ध झाल्याने सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात कपात प्रस्तावित केली आहे.

सिंचनाच्या पाणीवापरात २.८६ टीएमसी व वीजनिर्मितीच्या पाणी वापरात ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. ही कपात मान्य झाली आणि उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्यास राज्यात भारनियमन वाढण्याची शक्यता आहे.

कोयना धरणाची एकूण साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. चालू वर्षी १ जून २०२३ ला धरणामध्ये एकूण १७.६४ टीएमसी साठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात ४४० मिमी व पाणी आवकमध्ये ३९.७१ टीएमसी घट झाली आहे. १ जून ते १४ ऑक्टोबर दरम्यान सिंचनव वीजनिर्मितीसाठी अनुक्रमे ५.४६ टीएमसी व २३.०३ टीएमसी वापर झाला आहे.

Koyna Dam water storage
Koyna Dam Water Sangli : कोरडी पडलेली कृष्णा, कोयनेच्या पाण्यामुळे भरली; शेतकऱ्यांना दिलासा

उपलब्ध पाणीसाठ्याच्या कमतरतेमुळे रब्बी व उन्हाळी हंगामामधील नियोजित पाणीवापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित केली आहे. त्यापैकी सिंचनाच्या पाणी वापरात २.८६ टीएमसी व वीजनिर्मितीच्या पाणीवापरात ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे.

त्यानुसार पुणे येथील जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचन व वीजनिर्मितीसाठी एकूण ७० टीएमसी इतका मर्यादेत पाणीवापराबाबत सूचना केल्या आहेत. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली तर एकतर खासगी क्षेत्रातून वीज विकत घेणे किंवा भारनियमन करण्याशिवाय सरकारकडे पर्याय राहणार नाही.नियमनाला सामोरे जावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com