Cow Milk Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Subsidy : गाय दुधाचे पाच रुपये अनुदान लाभार्थ्यांची संख्या गुलदस्त्यात

Cow Milk Rate Subsidy : राज्य शासनाने अशा दूध उत्पादकांना पाठबळ देण्यासाठी गाय दूधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.

sandeep Shirguppe

Cow Milk Rate : राज्य शासनाकडून मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गाय दूधासाठी प्रतिलिटरला ५ रुपये दर अनुदान जाहीर केले. दरम्यान यामध्ये नियम व अटी लागू केल्याने कित्येक महिने या अनुदानापासून शेतकरी वंचित राहिले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी चौदा कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले. मात्र, प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा झाली का? याबाबत अद्यापही साशंकता व्यक्त केली जात आहे.

खाजगी आणि सहकारी दूध संस्थांनी गाय दुधाच्या दरात अचानक कपात केल्याने मागच्या वर्षी नोव्हेंबर २०२३ ला दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्याभर आंदोलने केली. गाय दुधाचा दर प्रतिलिटर २० ते २२ रुपयांपेक्षाही खाली आला. राज्य शासनाने अशा दूध उत्पादकांना पाठबळ देण्यासाठी गाय दूधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. ही घोषणा करताना जे संघ शासनाकडून जाहीर झालेला किमान २७ रुपये दर देत असतील त्यांनाच हे अनुदान दिले जाईल. अशी अट घातली.

यानंतर जे दूध संघ किमान दर देत नव्हते त्यांनी त्यापटीत दर दिले. त्यानंतर शासनाकडून गाय दूध उत्पादकांची यादी अद्ययावत करण्यास सुरवात झाली. जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाकडे सर्वाधिक ७० हजार उत्पादकांची नोंदणी झाली. याशिवाय वारणा, कृष्णा, शाहूसह इतर सर्व सहकारी दूध संघांकडून दूध उत्पादकांची याद्या देण्यात आल्या.

शासनाने या सर्व शेतकऱ्यांसाठी १४ कोटी रुपये मंजूर केले. त्यानूसार काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केल्याचेही सांगण्यात आले. प्रत्यक्ष किती उत्पादकांना याचा लाभ मिळाला, किती उत्पादक या निधीपासून वंचित आहेत. ही संख्या अद्यापही गुलदस्त्यातच आहे. शासनाकडून अशी यादी अजूनही मिळालेली नाही यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा झाली हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे.

गाय दूधाचे दर कमी होत आहेत. कोल्हापूर जिल्हा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यात गायीच्या दूधाची खूपच कमी दराने खरेदी केली जात आहे. याकडे शासनाने लक्ष देणे अपेक्षित आहे. गोकुळ संघाकडून सत्तर हजार दूध उत्पाकदकांची यादी अद्ययावत झाली आहे. शासनाने मंजूर केलेल्या चौदा कोटी रुपयांमध्ये बहुतांशी उत्पादक हे गोकुळचे आहेत. मात्र, याचा निश्‍चित आकडा अजून शासनाकडून आलेला नाही.

- डॉ. योगेश गोडबोले, कार्यकारी संचालक, गोकुळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT