Aslam Abdul Shanedivan
पन्हाळा हा कोल्हापूरच्या पावसाळी पर्यटनातला मुकुटमणी असून हे थंड हवेचे ठिकाण देखील आहे. त्यामुळे येथे आवर्जून भेट द्या.
अनेकांच्या वाचणाच अथवा ऐकण्यात येणारे वाडी रत्नागिरी म्हणजेच श्रीक्षेत्र जोतिबा. हे देखील पावसाळ्यात भटकंतीचे चांगले ठिकाण आहे
१० पठारांचे आणि ३० किमी पर्यंत पसरलेलं मसाई पठार वेगवेगळ्या प्रजातीच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे पर्यटक पावले वळतात
पश्चिम महाराष्ट्रात एन्ट्री करण्याच्या मार्गांपैकी एक असणारा गगनबावडा आणि करूळ घाटात पावसाळ्यात अनेक नयनरम्य दृश्ये पहावयास मिळतात
कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गसौंदर्याने नटलेला तालुका म्हणजे राधानगरी. येथेच राधानगरी धरण आणि अभयारण्य देखील आहे. पण येथेच प्रसिद्ध असा राऊतवाडी धबधबा आहे.
कोल्हापूर पासून ७० किलोमीटरवर असलेला आंबा घाट कोकणातील रत्नागिरीकडील प्रवेशद्वार. येथे पावसाळा व हिवाळ्यात धुक्यांची चादर पाहायला मिळते.
सह्याद्रीच्या डोंगररांगावर वसलेला विशाळगड किल्ल्यावर जाताना पावसासह दैदिप्यमान इतिहास अनुभवता येतो. येथेच पावनखिंड देखील आहे.