Agrowon Podcast : हरभरा भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच गवार दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, ज्वारी आणि गवार पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : सरकारने खरिप हंगामातील हमीभाव जाहीर केल्यानंतर कापसाच्या बाजारात काहीशी सुधाऱणा दिसून आली. देशातील कापसाचे वायदे आज ७९० रुपयांनी वाढून ५७ हजार ७४० रुपयांवर पोचले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळीही काही वाढली होती. किमान भागात १०० ते १५० रुपयांची सुधारणा दिसून आली. मात्र सरासरी दरपातळी ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होती. बाजारातील कापूस आवकही घटली आहे. कापूस बाजारात काहीशी सकारात्मक परिस्थिती दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार दिसून आले. काही ठिकाणी बाजारात ५० रुपयांपर्यंतची सुधारणा झाली होती. तर अनेक ठिकाणी बाजार स्थिर होता. सोयाबीनचा बाजार सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ११.७५ डाॅलरवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३६३ डाॅलर प्रतिटनांवर होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : कांद्याच्या भावातील सुधारणा कायम; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहेत तूर दर ?

सरकारने आयात करून दर कमी करण्याचा प्रयत्न केला तरी भाव टिकून आहेत. हरभऱ्यातील तेजी मागील काही आठवड्यांपासून कायम आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. हरभरा निर्यातदार ऑस्ट्रेलियातही हरभरा चांगलाच भाव खात आहे. त्यामुळे आयात हरभराही महाग पडत आहे. परिणामी हरभऱ्याचे भाव बहुतांशी बाजारांमध्ये ६ हजारांवर पोचले. तर सरासरी भावपातळी सध्या ५ हजार ८०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. हरभऱ्याची ही भावापतळी आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्याससांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Tur Market : खारपाणपट्ट्यातील तूरडाळ पोहोचली सातासमुद्रापार

ज्वारीचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमलेले आहेत. रब्बी हंगामात ज्वारीचे उत्पादन चांगले आल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी उत्पादन कमी राहिल्याचे कळवत आहेत. पण बाजारातील आवक वाढल्यानंतर ज्वारीतील तेजी कमी झाली. ज्वारीला मागील काही आठवड्यांपासून २ हजार ३०० ते ३ हजारांचा भाव मिळत आहे. हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे. ज्वारीवरीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात. त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे अभ्यासकांनी सांगितले. 

बाजारात गवारची आवक कमीच असून दुसरीकडे गवारचा उठाव चांगला आहे. त्यामुळे गवारचे भाव तेजीत आहेत. गवारच्या उन्हाळी लागडीसाठी अनेक भागात पाण्याची टंचाई होती. आजही पिकाला बहुतांशी ठिकाणी पाणी कमी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्याचा परिणाम गवारच्या बाजारातील आवकेवर होत आहे. त्यामुळे गवारचा भाव ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. गवारचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com