Tur Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Procurement : ‘नाफेड’चे पोर्टल बंदच; तूर नोंदणी खोळंबली

Tur Purchase : केंद्र व राज्य सरकारच्या ‘नाफेड’ तसेच पणन महासंघाकडून २४ जानेवारीपासून तूर खरेदीसाठी शेतकरी नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते; परंतु अधिकृत वेबसाईट पोर्टलच सुरू नसल्याने तूर खरेदीसाठी नोंदणी खोळंबली असून, हमीभाव खरेदी केंद्रांवरील नोंदणी सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

Team Agrowon

सकाळ वृत्तसेवा

Tur Market : जळगाव : केंद्र व राज्य सरकारच्या ‘नाफेड’ तसेच पणन महासंघाकडून २४ जानेवारीपासून तूर खरेदीसाठी शेतकरी नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते; परंतु अधिकृत वेबसाईट पोर्टलच सुरू नसल्याने तूर खरेदीसाठी नोंदणी खोळंबली असून, हमीभाव खरेदी केंद्रांवरील नोंदणी सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

डिसेंबर-जानेवारी दरम्यान थंडीचा कडाका वाढताच शेतकऱ्याच्या घरात तुरीचे उत्पादन येण्यास सुरवात झाली होती. नव्या वर्षात तुरीचे पीक जोमदार येणार म्हणून शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण होते. जानेवारीदरम्यान हमीभाव खरेदी केंद्रांवर ७ हजार ५५० रूपये हमीदर तूर खरेदीसाठी जाहीर करीत शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन देखील करण्यात आले.

दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर उत्पादन हाती येताच बाजार समितीत विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बाजारात पडत्या दराने कमी प्रतिचा माल म्हणून शेतकऱ्यांकडील तूर खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.

हमीभाव जाहीर; नोंदणी बंदच

नव्या वर्षात नवीन तूरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या घरात येण्यास सुरूवात होताच बाजार समित्यांमध्ये तुरीचे बाजारभाव तब्बल हजार रुपयांनी खाली आले आहेत. तर नाफेड तथा पणन महासंघांतर्गत शासकीय हमीभाव केंद्र नोंदणी अद्यापही सुरू झालेली नाही.

शेतकऱ्यांसमोर अडचणी

जिल्ह्यात १६ हमीभाव केंद्र मंजूर असून, या केंद्रांवर तूर खरेदीसाठी नोंदणी कधी सुरू होणार याची शेतकरी वाट पाहत थांबले आहेत. सद्यस्थितीत लग्नसराईचा हंगाम सुरू असून, कुणा शेतकऱ्याच्या घरात लग्न, मुलांचे शैक्षणिक शुल्क भरणे, नवीन घर बांधणी, औषधोपचार, पीक कर्ज परतफेड या सर्व बाबी शेतकऱ्यांसमोर ‘आ’वासून आहेत.

भाव नसल्याने कोंडी

तुरीचे उत्पादन घरात येताच बाजारात तुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. हे नेहमीचेच असून बऱ्याच शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये तूर उत्पादन आणून आडत व्यापाऱ्याला मिळेल त्या दराने विकली. तर अनेकजण हमीभाव खरेदी नोंदणीच्या मागे न लागता बाजार समित्यांत तूर आणून विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतमालाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे.

सध्या तूर मातीमोल भावाने विकली जात असल्याने झालेला खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा मेळ बसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बाजार समितीत आवक

जळगाव जिल्ह्यात काही तालुक्यात तुरीचे उत्पादन आंतरपीक म्हणून घेतले जाते. तर काही तालुक्यात बागायती तुरीचे उत्पादन घेतले जाते. बहुतांश ठिकाणी बाजार समित्यांत तूर उत्पादन विक्रीसाठी येत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दररोजची आवक सरासरी ५० ते १०० क्विंटल आहे. तर प्रति क्विंटल दर ७१०० ते ६५०० आहेत.

वरातीमागून घोडे नेहमीचेच

शेतकऱ्यांचा शेतमाल काढणी झाल्यानंतर शासनाकडून महिना दोन महिन्याने उशिराने शासकीय हमीभाव केंद्रांवर नोंदणी सुरू होते. यावेळी देखील तूर हमीभाव केंद्रावर नोंदणीचे जाहीर आवाहन केले तरी हमीभाव केंद्र सुरू झालेले नाहीत. त्यामुळे शासनाने हमीभाव केंद्र सुरू करावे; अथवा सध्या मिळत असलेली किमत व शासकीय हमीभाव फरक, ही रक्कम सोयाबीन, कापूस उत्पादकांना दिली होती. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT