Tur Procurement : ‘नाफेड’च्या तूर खरेदीस अल्प प्रतिसाद

Tur Market : राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाच्या (नाफेड) वतीने किंमत स्थिरीकरण योजना (प्राइस स्टॅबिलायझेशन फंड ः पीएसएफ) अंतर्गत बाजारभावाने तूर विक्री नोंदणीस राज्यभरात शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद आहे.
Tur Market
Tur MarketAgrowon

Parbhani News : राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाच्या (नाफेड) वतीने किंमत स्थिरीकरण योजना (प्राइस स्टॅबिलायझेशन फंड ः पीएसएफ) अंतर्गत बाजारभावाने तूर विक्री नोंदणीस राज्यभरात शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद आहे.

या योजनेतील राज्यातील विविध यंत्रणांतर्गतच्या केंद्रांवर गुरुवार (ता. १८) पर्यंत २ हजार १७९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु खुल्या बाजारातील तुरीचे दर हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांवर तूर खरेदी सुरू झालेली नाही, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

शासनाने यंदा खरीप कडधान्यांची (तूर) हमीभावाने नव्हे, तर बाजारभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चुरस निर्माण होईल व शेतकऱ्यांचा फायदा होईल, असा उद्देश आहे. याअंतर्गत राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, महा-एफपीसी, महाकिसान संघ, महाकिसान वृद्धी अॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनी, महास्वराज्य अॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनी, पृथाशक्ती फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनी या यंत्रणांमार्फत परवानगी दिलेल्या केंद्रावर शेतकरी नोंदणी सुरी करण्यात आली आहे.

Tur Market
Tur Production : तुरीच्या उत्पादनात मोठी घट

शासनाने यंदा तुरीसाठी किमान आधारभूत किंमत (हमीभाव) प्रतिक्विंटल ७ हजार रुपये जाहीर केली आहे. मात्र बाजारामध्ये तुरीची हमीभावापेक्षा अधिक दराने खरेदी केली जात असल्यामुळे शासकीय केंद्रांवर नोंदीकडे शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद नाही.

राज्य सहकारी पणन महासंघ (स्टेट कॉ-ऑप. मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत संस्थांच्या नगर, अकोला अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, बीड, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नागपूर, धाराशिव, परभणी, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांतील केंद्रांवर १ हजार १०९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

त्यात हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार (औंढा नागनाथ) केंद्रावर १६ शेतकऱ्यांनी हिंगोली केंद्रावर १५, सेनगाव केंद्रावर ४, जिंतूर केंद्रावर ११, मानवत केंद्रावर १०, पाथरी केंद्रावर ६, बोरी केंद्रावर १० असे एकूण ७२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

Tur Market
Tur Production : आगामी खरिपात तुरीवर करा लक्ष केंद्रित

महा-एफपीसीच्या परभणी, वाशीम, नांदेड, लातूर, हिंगोली, बुलडाणा, बीड, अकोला, नगर जिल्ह्यांतील केंद्रांवर १३८ शेतकऱ्यांनी, महाकिसान संघाच्या नांदेड, हिंगोली, लातूर, नगर जिल्ह्यातील केंद्रांवर ७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

महाकिसान वृद्धी अॅग्रो कंपनीच्या अमरावती, भंडारा, परभणी जिल्ह्यांतील केंद्रावर ३७ शेतकऱ्यांनी, महास्वराज्य अॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनीच्या अकोला, अमरावती, बुलडाणा, जळगाव, जालना, नांदेड, परभणी, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांतील केंद्रांवर २५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पृथाशक्ती फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीच्या नगर, बीड, बुलडाणा, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांतील केंद्रांवर १३० शेतकऱ्यांनी, तर विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या (व्हीसीएफ) अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांतील केंद्रांवर ४३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com