Mustard Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Mustard Cultivation : सुधारित पद्धतीने मोहरी लागवड

Mustard Farming : पेरणी ऑक्‍टोबरचा शेवटचा पंधरवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी ठेवावे. दोन झाडांतील अंतर १० ते १५ सेंमी ठेवावे. गव्हाबरोबर आंतरपीक ९:१ किंवा ६:१ या प्रमाणात ओलीमध्ये पेरणी केल्यास फायदेशीर ठरते.

Team Agrowon

डॉ. संदीप कामडी, डॉ. दिक्षा ताजने

Mustard Production : मोहरी हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे, कमी खर्चाचे आणि आर्थिकदृष्टया फायदेशीर पीक आहे. मोहरीच्या बियांमध्ये ३२ ते ४० टक्के तेलाचे प्रमाण असते. मोहरीच्या कोवळ्या हिरव्या पानाची भाजी आरोग्याला उत्तम असते. भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम तसेच ‘अ’ आणि ‘क’ ही आवश्यक जीवनसत्त्वे असतात. मोहरीच्या ढेपेमध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने असून दुधाळ जनावरांकरिता उपयुक्त खाद्य आहेत.

हे पीक साधारणपणे: दोन किंवा तीन ओलिताच्या पाळ्या दिल्यास चांगले उत्पादन देते, त्यामुळे कमी पाण्यामध्ये या पिकाचे चांगले उत्पादन मिळते. योग्य वेळी पेरणी केली तर कीड आणि रोगांचा फार कमी प्रादुर्भाव होतो. मोहरी पिकामध्ये असलेल्या ग्लुकोसिनोलेट या घटकामुळे रानटी आणि मोकाट जनावरांचा उपद्रव कमी होण्यास मदत होते. शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये पक्षापासून संरक्षण करण्याची आवश्यकता नसते.

मध्यम खोल जमीन किंवा खारवट जमिनीत या पिकाची लागवड करावी. पीक परिपक्व होत असताना झाडांची सर्व पाने जमिनीवर गळून पडतात. ही पाने जमिनीत कुजल्यामुळे सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते.

सोयबीन नंतर मोहरी पिकाची लागवड करावी. पूर्व विदर्भात खरिपात भात काढणीनंतर मोहरी लागवड करावी. जातीची लागवड करून रब्बीमध्ये मोहरी पिकाची लागवड करणे अधिक फायद्याची ठरू शकते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रती हेक्टरी १२ क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता असलेली टीएएम १०८-१ ही जात विकसित केली आहे.

लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रकारची जमीन तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. खरीप पिकाची काढणी झाल्यानंतर जमीन खोलवर नांगरून आडवी उभी वखरणी करून चांगली भुसभुशीत करावी. ओलिताखाली पीक घ्यावयाचे झाल्यास वखराच्या किंवा सारा यंत्राच्या साह्याने सारे पडावेत, यामुळे पाणी चांगले समप्रमाणात देणे सोपे जाते.

साधरणपणे प्रति हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. बियाण्याची चांगली उगवण होण्यासाठी पेरणीच्या आधी रात्री बियाणे ओलसर पोत्यात ठेवावे.

पेरणी ऑक्‍टोबरचा शेवटचा पंधरवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी ठेवावे. दोन झाडांतील अंतर १० ते १५ सेंमी ठेवावे. बियाणे आकाराने लहान असल्यामुळे बियाण्याच्या आकाराची वाळू सम प्रमाणात मिसळूननंतर पेरणी करावी. यामुळे बियाणे सर्व क्षेत्रात समप्रमाणात पडेल. बियाण्याची चांगली उगवण होण्याच्या दृष्टीने पेरणी साधरणत: ३ ते ४ सें.मी. खोलीवर करावी. बियाणे ओलीवर पडेल अशा बेताने पेरावे.

कोरडवाहू भागात पेरणी जमिनीत ओल असताना तसेच ओलीताखालील मोहरीच्या पेरणीकरिता पेरणीपूर्वी एक ओलिताची पाळी देऊन वाफसा येताच पेरणी करावी. पाणी देण्यासाठी सारे काढावेत. पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करावी. साधरणत: दोन झाडांतील अंतर १० ते १५ सेंमी राहील यादृष्टीने विरळणी किंवा खाडे भरणी करावी म्हणजे शेतात हेक्टरी १.५ ते २.२ लाख रोपांची संख्या राहील.

गव्हाबरोबर आंतरपीक ९:१ किंवा ६:१ तसेच हरभरा पिकाबरोबर ६:१ किंवा ५:२ या प्रमाणात ओलीमध्ये पेरणी केल्यास फायदेशीर ठरते. गव्हाबरोबर आंतरपीक ९:१ किंवा ६:१ या प्रमाणात ओलीमध्ये पेरणी केल्यास फायदेशीर ठरते.

हे पीक कोरडवाहू तसेच ओलिताची सोय उपलब्ध असल्यास ओलिताखाली सुद्धा घेऊ शकतो. ओलिताखाली हे पीक घेत असताना हेक्टरी ५० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद या रासायनिक खताची मात्रा द्यावी. हेक्टरी २५ किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद पेरणीच्या वेळेस आणि उरलेले २५ किलो नत्र २५ ते ३० दिवसांनी म्हणजेच पहिल्या पाण्याच्या पाळीच्या वेळेस द्यावे. उत्पादन वाढीसाठी प्रती हेक्टरी २० किलो गंधक आणि १ किलो बोरॉन पेरणीच्या वेळीच द्यावे. कोरडवाहू परिस्थितीत प्रती हेक्टरी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद द्यावे. कोरडवाहू मोहरीचे अधिक उत्पादनासाठी शिफारशीत खत मात्रेसह ५० टक्के फुलोरा अवस्थेत १ टक्का युरियाची पिकावर फवारणी करावी.

सुधारित जाती आणि गुणधर्म

जात फुलोऱ्यावर येण्याचा कालावधी (दिवस) परिपक्व होण्याचा कालावधी (दिवस) हेक्टरी उत्पादन (क्विंटल) तेलाचे प्रमाण (टक्के)

पीडीकेव्ही कार्तिक ४५-५० १०१-१०७ १२-१६ ३७-४०

टीएएम १०८-१ ४५-५० १००-११० ८-१२ ३५-४०

शताब्दी(एसीएन-९) ४०–४२ ९५-१०५ ८-१० ३१-४०

डॉ. संदीप कामडी, ९४२३४२१५६७.

(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (जवस आणि मोहरी), कृषी महाविद्यालय, नागपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT