Mustard Oil : मोहरी तेलाचे आरोग्यदायी फायदे

Mustard Oil Benefits : आपल्या सर्वांनाच मोहरी ही परिचित आहे. मोहरी तिच्या पौष्टिक गुणधर्म आणि औषधी महत्त्वांसाठी ओळखली जाते.
Mustard Oil
Mustard OilAgrowon

सचिन अवचार

Health Benefits of Oil : आपल्या सर्वांनाच मोहरी ही परिचित आहे. मोहरी तिच्या पौष्टिक गुणधर्म आणि औषधी महत्त्वांसाठी ओळखली जाते. मोहरीच्या विविध जाती आहेत. त्यातील ब्रासिका हिर्टा किंवा अल्बा (पिवळा-पांढरा), बी. निग्रा (काळा), आणि बी. ज्युन्सिया (तपकिरी) या प्रमुख तीन जाती आहेत. एक महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणूनही मोहरी ओळखली जाते. आशियायी देशांमध्ये मोहरी उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो.

Mustard Oil
Mustard Production : मोहरी उत्पादक शेतकऱ्यांनी उद्योजक व्हावे : डॉ. उंदीरवाडे

अन्नपदार्थ निर्मितीमध्ये मोहरी तेलाचा वापर केला जातो. मोहरीमुळे अन्नपदार्थांची चव वाढते. अन्नाची रुचकरता वाढते. मोहरीच्या दाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात खनिजे असतात. याशिवाय मोहरी तेलाच्या आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे विविध व्याधींच्या उपचारामध्ये देखील वापर केला जातो. संधिवात, पाय दुखणे, हाडांची दुखणे, केसाच्या समस्या यासारख्या विविध समस्येवर मोहरी गुणकारी मानली जाते.

मोहरीचे दाणेदेखील प्रथिनांचा उत्तम स्त्रोत मानले जाते. मोहरी बियांमध्ये तंतुमय पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. मोहरीमध्ये ॲण्टिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स गुणधर्मामुळे कर्करोग, मोतीबिंदू, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरते. मोहरी तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदेशीर असले तरीदेखील त्याचा आहारामध्ये जास्त वापर प्रमाणात करताना काळजी घ्यावी.

Mustard Oil
Mustard MSP : मोहरीचे दर हमीभावाच्या खाली गेल्यास खरेदी सुरू करू: मुंडा

आरोग्यदायी फायदे

ॲण्टिकार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. त्यामुळे कर्करोग होण्यापासून प्रतिबंध होतो.

मोहरीमध्ये ॲण्टिफंगल आणि ॲण्टिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्वचा विकारांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो.

लहान मुलांमधील दमा, ॲलर्जीमुळे होणारी सर्दी यापासून बचाव करण्यासाठी मोहरी उपयुक्त ठरते.

संधिवात असलेल्या रुग्णांनी मोहरी तेलाने मालिश केल्यास आराम मिळतो. पायदुखी असल्यास मोहरी तेलाने मालिश केल्यास पायाच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत होते. वेदनेपासून आराम मिळतो.

डोळे आणि घशामध्ये होणाऱ्या जळजळीसाठी मोहरी उपयुक्त ठरते.

मोहरीचे दाणे प्रथिने, फायबर, खनिजे, जीवनसत्त्वे, ॲण्टिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सचा उत्तम स्रोत मानले जातात.

केसाचे आरोग्य राखण्यासाठी मोहरी उपयुक्त ठरते. केस गळती कमी करण्यासाठी तसेच केसामध्यो होणारी कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी मोहरी तेलाचा वापर केला जातो. केस धुण्यापूर्वी मोहरी तेलाने मालिश करावी. त्यामुळे केसातील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते. केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते.

त्वचेचे आरोग्य राखण्यास मोहरी बिया फायदेशीर ठरतात. मोहरी तेलामुळे त्वचेचे तेज सुधारण्यास मदत होते. कोरड्या त्वचेच्या स्कीन समस्येवर मोहरी बिया उपयुक्त ठरतात. मोहरी बियांमधील ॲण्टी फंगल गुणधर्मांमुळे फंगल इनफेक्शनची समस्या दूर राखण्यास उपयुक्त ठरते.

सचिन अवचार,

९१५६४६७१०६ (संशोधक विद्यार्थी, आनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन,

सॅम हिगिनबॉटम कृषी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विद्यापीठ, प्रयागराज, उत्तर प्रदेश)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com