Moong Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Farming : देवणीच्या शेतशिवारात मूग आले काढणीला

Moong Harvesting : देवणी तालुक्यातील शेतशिवारात आता मूग काढणीला आलेले आहे. मात्र रिमझिम पावसामुळे मुग काढणीच्या कामाला विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

Team Agrowon

Latur News : देवणी तालुक्यातील शेतशिवारात आता मूग काढणीला आलेले आहे. मात्र रिमझिम पावसामुळे मुग काढणीच्या कामाला विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

मृग नक्षत्रात पेरणी झाल्यानंतर उत्पादनाची हमी असल्याने मुग उडीद या पिकांचे क्षेत्र वाढते. यावर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी झाल्याने मुगाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला पर्याय म्हणून मुगाच्या पिकाला प्राधान्य दिले. यंदा प्रारंभीच्या सततच्या भीजपावसाने पिकांची वाढ समाधानकारक झाली. मात्र आता ऐन काढणीच्या वेळी सततच्या भीजपावसाने पिकांचे नुकसान होत आहे.

सध्या शेतशिवारात मुगाच्या शेंगा तोडणीची लगबग सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून दिवसभरात बहुतांश वेळा रिमझिम पावसाची हजेरी राहत आहे. त्यामुळे मूग काढणीसाठी आलेल्या महिला मजुरांच्या कामात अडथळा येत आहे. मुग काढणीस विलंब होत असल्याने शेंगा फुटणे, मुग पांढरा पडून नुकसान होत आहे.

ज्या शेतकऱ्याकडे मुगाचे क्षेत्र दोन एकरपेक्षा अधिक आहे, त्यांनी हार्वेस्टरच्या साह्याने काढणी करून रास करण्यास प्राधान्य दिले आहे. तर कमी क्षेत्रावर अथवा केवळ घरगुती डाळीची गरज भागवण्यासाठी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना काढणीत अडचणी येत आहेत.

मजुरांकडूनही शेतकऱ्यांची अडवणूक

मुग काढणीसाठी मजुरांची मोठी गरज भासते. डाळीचे धान्य असल्याने मुगाची काढणी हिश्शेवारीने होते. त्यातच भीजपावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची आता मजुरांकडूनही अडवणूक सुरू झाली आहे. अनेकजण अधिकची मजुरी मागत आहेत. एकीकडे वन्यप्राण्यांचा उपद्रव तसेच दुसरीकडे सततचा पाऊस यामुळे वेळेत मुगाची काढणी न झाल्यास नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मुगाच्या काढणीसाठी मजुरांना मागणीप्रमाणे अधिकची मजुरी द्यावी लागत आहे.

शेतशिवारात हरणांचा उपद्रव

सध्या शेतशिवारात १०० ते १५० च्या संख्येने हरणाचे कळप फिरताना दिसत आहेत. काढणीला आलेला मुग हा कळप फस्त करीत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय रानडुक्कर, मोर यांच्याही उपद्रवामुळे मुगाचे नुकसान होत आहे. शेतशिवारात अन्य खाद्य नसल्याने वानरांनीही आपला मोर्चा मुगाच्या शेतीकडे वळवला आहे. मोठे कष्ट करून जगवलेले पीक शेवटच्या वेळीच बदलते वातावरण अन वन्य प्राण्याच्या भक्षस्थानी पडत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Drill Subsidy: हिंगणघाट बाजार समिती देणार अनुदानावर पेरणी यंत्र

Farmer Insurance App Issue: ॲप, टोल फ्री नंबरवर तक्रारीची नोंद होईना!

Avocado Farming Success: दिवे येथे अ‍ॅव्होकॅडो फळपीक उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

Farmer Death: कसमादे पट्ट्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Sugar Industry Growth: साखर उद्योगाला चालना मिळणार

SCROLL FOR NEXT