Pulses Harvesting : मुगाची काढणी पूर्ण; उडदाची सुरू

Moong Harvesting : विभागातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर असून, २७ लाख ९६ हजार ६६२ हेक्टर क्षेत्रावर १०१ टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली.
Moong Urad
Moong UradAgrowon
Published on
Updated on

Latur News : विभागातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर असून, २७ लाख ९६ हजार ६६२ हेक्टर क्षेत्रावर १०१ टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली. पावसाच्या खंडांमुळे सर्वच पिकांच्या वाढीवर परिणाम झाला.

मुगाची काढणी पूर्ण झाली असून, उडदाची काढणी जवळपास २० टक्के पूर्ण झाली आहे. शिवाय पावसाच्या अनेक खंडांमुळे उत्पादकतेत मोठी घट येणार हे स्पष्ट आहे.

लातूर विभागात मागील सप्ताहात हवामान उष्ण व ढगाळ होते. लातूर विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मिलिमीटर असून, ३ ऑक्टोबरपर्यंत ६२९.१८ मिलिमीटर इतका पाऊस झाला. पाऊस ३ ऑक्टोबरच्या सरासरीच्या ८४ टक्के असून, वार्षिक सरासरीच्या ७७ टक्के झाला आहे.

Moong Urad
Moong Production : मुगाची अवघी २६ किलो प्रति हेक्‍टरी उत्पादकता ; सातत्याने उत्पादकतेत घट

खरीप ज्वारी : २३ हजार १०७ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. ज्वारी उत्पादनात ३० ते ४० टक्के घटीची शक्यता आहे.

बाजरी : २ हजार ४१४ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. बाजरी उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता आहे.

मका : १२ हजार ५६६ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. यंदा पीक उत्पादनात २५ ते ३० टक्के घट येण्याची शक्यता आहे.

Moong Urad
Urad Market : खानदेशात उडीद आवक सुरू

मूग : ४० हजार २४२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असून, सध्या ४५ ते ५० टक्के काढणी पूर्ण झाली आहे. पीक उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता आहे.

उडीद ः ५४ हजार ०३० हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. २० टक्के काढणी पूर्ण झाली आहे. यंदा उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता आहे.

तूर ः २ लाख ३५ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. यंदा उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता आहे.

सोयाबीन ः १९ लाख ३ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. यंदा उत्पादनात ५० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता आहे.

कापूस ः ४ लाख ३७ हजार ४०७ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. पीक सध्या पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत असून, नांदेड व परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी रस शोषण करण्याऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. काही ठिकाणी गुलाबी बोंड अळीचे पतंग व अंडी दिसून येत आहेत. यंदा उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com