Soybean Maize Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Soybean MSP : सध्या तालुक्यात मका, सोयाबीनचा हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी मालाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Nashik News : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मका व सोयाबीन मालाची हमीभावाने खरेदी होण्यासाठी शासनस्तरावरून किमान आधारभूत खरेदी केंद्रे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सुरू करण्याची मागणी सभापती संजय जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

नायब तहसीलदार बाबासाहेब खेडकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा, मका, सोयाबीन आदी शेतीमालाचे उत्पादन घेतले आहे.

बी-बियाणे, रासायनिक खते, मजूर जीएसटीमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतीमालाला रास्त भाव मिळणे आवश्यक आहे. परंतु उत्पादनापेक्षा कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. सध्या तालुक्यात मका, सोयाबीनचा हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीसाठी मालाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे.

केंद्राने २०२४-२५ साठी मका या शेतीमालाला २ हजार २२५ व सोयाबीनला ४ हजार ८९२ दराने हमीभाव जाहीर केलेला आहे. केंद्राने जाहीर केलेले हे हमीभाव उत्पादन खर्चाला आधारित नाही. त्यामुळे किमान आधारभूत खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

केंद्राने हमीभावाने शेतीमाल विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी अॅप सुरू केले आहे. मात्र त्याची माहिती शेतकऱ्यांना नसते. त्यामुळे ऑनलाइन नोंदणीबाबत कार्यक्रम राबवावेत, अशी मागणी सभापती संजय जाधव, समाधान जामदार, मनोज जाधव, गोरक्षनाथ रकिबे, भगवान जाधव, सागर जाधव आदींनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT