Onion Export Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export : कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क तत्काळ हटवा ; राज्यातील खासदारांची वाणिज्यमंत्री गोयल यांच्याकडे मागणी

Onion Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क तत्काळ हटविण्याची मागणी, राज्यातील महविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने वाणिज्य मंत्री पियुष गोयल व राज्यमंत्री जितिन प्रसाद यांची भेट घेउन केली.

Team Agrowon


Nashik News : नाशिक : देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क तत्काळ हटविण्याची मागणी, राज्यातील महविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने वाणिज्य मंत्री पियुष गोयल व राज्यमंत्री जितिन प्रसाद यांची भेट घेउन केली.

राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची वाढलेली आवक व कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटाबाबत चर्चा केली. तातडीने निर्यात शुल्कासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी मंत्री गोयल यांच्या भेटीप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, नीलेश लंके, बजरंग सोनवणे, डॉ. शोभा बच्छाव, गोवाल पाडवी, वर्षा गायकवाड, मारूतीराव कोवासे आदी उपस्थित होते. यावेळी कांद्याच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे खासदार भगरे यांनी सांगितले.

भेटीदरम्यान कांदा उत्पादक पट्ट्यातील खासदारांनी मंत्री गोयल यांना कांदा उत्पादन व कांदा दरातील घसरणीबाबत माहिती दिली. कांद्याची आवक वाढत असल्याने कांद्याच्या दरात क्विंटलमागे २,००० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामध्ये सध्य परिस्थितीमध्ये मिळणारा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा नाही.

कांदा उत्पादन खर्च वाढता आहे, त्यात शेतकऱ्यांचे नुकसान वाढल्याने कांदा उत्पादकांचे अर्थकारण कोलमडल्याचे यावेळी सांगण्यात आले. मंत्र्यांनी याबाबत म्हणणे ऐकून घेतले मात्र कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न दिल्याचे खासदारांनी सांगितले.

कांदाप्रश्नी केंद्र अनुकूल दिसत नाही
कांद्याच्या वाढलेल्या आवकेमुळे दरात घसरण होत आहे. या पार्श्वभूमीवर २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यात यावे, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केंद्राला पत्र लिहून परिस्थिती अवगत केली आहे. तर आता खासदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर अडचणी मांडल्या. मात्र मंत्री गोयल यांची भूमिका ग्राहक हिताला प्राधान्य देणारी आहे. महत्त्वाचे असून सध्या कांद्याचे दर अडचणीचे नसल्याचे त्यांचा चर्चेदरम्यान सूर दिसून आला असे शिष्टमंडळातील खासदारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT