Onion Export Duty : कांदा निर्यातशुल्क वाढीचा फेरविचार करावा ; डॉ. भारती पवारांची पीयुष गोयल यांच्याकडे मागणी

Bharati Pawar : केंद्र सरकारने  कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे कांदा निर्यात शुल्क वाढीचा फेरविचार करावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे केली आहे.
Bharati Pawar
Bharati PawarAgrowon
Published on
Updated on

Onion Issue : मागील आठवड्यात केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारले. त्यामुळे राज्यभरात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी रस्त्यावर उतरून कांद्याचे लिलाव बंद पाडले. काही दिवसांपूर्वी निर्यात शुल्काच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी आता केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यातशुल्क वाढीचा फेरविचार करावा, अशी मागणी केली.

Bharati Pawar
Onion Export : कांदा निर्यात शुल्कावरून वाद चिघळणार, बाजार समित्या बेमुदत बंद राहणार

मागील काही महिन्यात टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला होता. त्याचप्रमाणे आगामी काळात कांद्याच्या दरातही मोठी वाढ होण्याचे संकेत असल्याने शेतकरी सुखावला होता.

तितक्यातच देशांतर्गत कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी आणि दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढीच्या निर्णय घेतला. या निर्णयानंतर राज्यभर तीव्र पडसाद उमटले.

Bharati Pawar
Onion Procurement : कांद्याची खरेदी भाव पाडण्यासाठी नव्हे तर..; नाफेडच्या खरेदीवर केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे स्पष्टीकरण

कांदा उत्पादक रस्त्यावर उतरले. तर निर्यातदारांसह कांदा व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद केले. शेतकऱ्यांना कांदा बाजारपेठेत आणता येत नसल्याने कांदा कोंडी झाली. दरम्यान, भारती पवार यांनी नाशिकमध्ये व्यापारी, शेतकरी आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तात्पुरता तोडगा काढला.

त्यानंतर बुधवारी (ता. ३१)  केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांची भेट घेऊन राज्यातील कांद्याच्या प्रश्नांवर चर्चा केली. राज्यातील सर्व माहिती सादर करत शुल्क वाढीचा निर्णय मागे घेण्याचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. यावेळी गोयल यांनी सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी असून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. 

कांदा आंदोलन पेटल्यानंतर केंद्र सरकारने २ लाख टन कांदा खरेदी करणार असून शेतकऱ्यांना २ हजार ४१० प्रतिक्विंटल भाव देणार असल्याची घोषणा केली होती. तसेच या कांद्याची नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (एनसीसीएफ) च्या माध्यमातून खरेदी सुरू केली होती.

यावर केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याची प्रतिक्रिया दिली होती. सरकारच्या निर्यात शुल्कवाढीच्या निर्णयामुळे शेतकरी संतप्त आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com