MP Supriya Sule agrowon
ॲग्रो विशेष

MP Supriya Sule : 'हा' प्रकार संतापजनक कृषी केंद्रांवर कारवाई करा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

sandeep Shirguppe

Urea Fertilizer : शेतकऱ्यांना खतांसोबत किटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. किटकनाशक घेतले तरच खते मिळतील, असे म्हणून त्यांची अडवणूक केली जात आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

खासदार सुळे या सध्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन याबाबत आपली भूमिका मांडली. हे शेतकरी जेंव्हा रासायनिक खते आणण्यासाठी दुकानात जातात, तेंव्हा त्यांना खतासोबत किटकनाशक विकत घेण्याची सक्ती केली जाते. ते घेतले तरच खते देणार असे सांगितले जाते, ही बाब शेतकऱ्यांनी सुळे यांच्या लक्षात आणून दिली.

हा प्रकार लक्षात येताच खासदार सुळे यांनी लागलीच ट्विट करत, 'हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. शेतकऱ्यांना अशा प्रकारची जबरदस्ती कुणालाही करता येत नाही. तरीही त्यांची अशी पिळवणूक होत असेल तर ते चुकीचे आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून अशा दुकानांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत', अशी मागणी केली आहे.

गरज नसताना अतिरिक्त खते घेण्याचा तगादा

खरीप हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांची खते, बी-बियाणे खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. एक युरिया पोते खरेदी केले की, त्यासोबत दोन नॅनो डीएपी किंवा युरिया बॉटल खरेदी करा, असा सल्ला दिला जातो. मागील पाच वर्षांच्या अनुभवात खत पोते १२०० रुपये, त्यावर दोन नॅनो बॉटलचे साडेचारशे रुपये भरून गरज नसताना खरेदी करावी लागत आहे. यातील नॅनो बॉटलचे खत कशावरही मारले तरी त्याचा शेतीसाठी चांगला उपयोग होतोच असे नाही. म्हणजे साडेचारशे रुपयांचा खर्च वाया जातो आहे. असा बिनकारणाचा खर्च खत कंपन्यांचा नफा वाढवून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहे.

‘खत खरेदी अशीच असते, लई विचार करू नका, घ्या त्या दोन बॉटल’ असे दामटून सांगत खत बाजारात लिकिंग पद्धत इतक्या खोलवर रुजवली आहे की, जणू हा व्यवहार अधिकृत भासावा, अशी स्थिती आहे. परिणामी, खत विक्रीतील हा काळाबाजार शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचे शाळकरी पोराच्याही लक्षात येतो. तरीही प्रशासनाकडून याकडे कानाडोळा केला जात आहे.

शेतकऱ्यांचा खिसा रिकामा

जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांनी बी-बियाणे, खत विक्रेत्यांची बैठक घेतली. चांगले बियाणे, चांगल्या दर्जाची खते शेतकऱ्यांना द्या. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना दिल्या. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान सुरूच आहे. पावसाचा अंदाज घेत, शेती नांगरून पेरणीची तयारी करण्यात बळिराजा मग्न आहे.

शेतीच्‍या कामातून त्याला फारशी फुरसत मिळत नाही, याचा अंदाज घेऊन खत कंपन्यांनी खरीप हंगामाच्या तोंडावर सुरू केलेली ‘लिंकिंगची शाळा’ खत कंपन्यांना गब्बर नफा करून देताना शेतकऱ्यांचा खिसा मात्र रिकामा करीत आहेत. दरम्‍यान, शेती उद्योगाला लागलेल्या लिंकिंग किडीचा प्रादुर्भाव रोखणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT