MP Sanjay Raut Agrowon
ॲग्रो विशेष

MP Sanjay Raut : '...राम तुम्हाला पावणार नाही', राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

Suspension of MPs : गेल्या तीन एक दिवसात केंद्राच्या हिवाळी अधिवेशनात जवळपास १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. या मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून खासदारांना निलंबित केलं जात आहे. आतापर्यंत जवळपास १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. ज्यात राज्यातील दोन खासदारांचा समावेश आहे. त्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहे. यावरूनच 'ही हुकूमशाही' असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (२० रोजी) केंद्रातील भाजपवर केली.

सभागृहात विरोधकांचे निलंबन करण्यात आल्याने आता विरोधकांची संख्या कमी आली आहे. 'सध्याच्या घडीला लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून राज्यातील फक्त ठाकरे गटाचे खासदार राहिले आहेत. आम्ही लढत राहू, या देशातील हुकूमशाही, लोकशाहीची हत्या सुरू असलेल्या घटनेविरूद्ध' असं राऊत म्हणाले. तसेच 'मदनावेळी ईव्हीएम मधून निघणाऱ्या व्ही व्ही पॅटचे देखील मोजणी व्हायला हवी', अशी मागणी त्यांनी केली.

'आम्ही काही मिंधे नाही, गुढगे टेकायला', असा टोला देखील राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. 'लोकशाही टिकविण्याची जबाबदारी आमच्याही खांद्यावर आहे. लोकशाहीचं मंदिर मोडून काढायचं आणि राम मंदिराचं उद्घाटन करायचं, लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्योत जाऊन पूजा करायची, उद्घाटन करायचं हे ढोंग आमच्याकडे नाही' असेही कानपिचक्या राऊत यांनी मारल्या.

'राम मंदिर आणि दिल्लीतले लोकशाहीचे मंदिर याची प्रतिष्ठा राहायला पाहिजे. जर दिल्लीतल्या सर्वोच्च मंदिराचे स्मशानकरून राम मंदिरात जाऊन नौटंकी कराल तर राम देखील तुम्हाला पावणार नाही', असेही राऊत म्हणाले.

इंडिया आघाडीवर राऊत काय म्हणाले?

तसेच इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठक आणि राहुल गांधी यांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, 'त्या बैठकीत मालिका अर्जुन खरगे यांच्या नावावर चर्चा झाली आहे. त्यांना १६ राष्ट्रीय पक्षांनी नेतृत्वगुण चेहरा म्हणून पसंती दिली आहे. मात्र यावर काँग्रेस पक्षच निर्णय घेईल', असेही राऊत म्हणाले. तसेच सध्या राहुल गांधी नको म्हणून खरगे यांच्या नावाला पसंती दिली जात आहे अशी चर्चा सुरू आहे. यावर देखील राऊत यांनी, 'राहुल गांधी यांनी सत्तेच्या पदावर येण्याची इच्छा नाही. मात्र ते इंडिया आघाडितील एक प्रमुख चेहरा आहेत. ते सध्या पक्षाच्या आणि संघटना बांघणीकडे लक्ष देत आहेत', असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, 'हे त्यांच्या खुर्चीच्या खाली दडलेल्या इव्हीएमच्या तंत्रावर ते बोलत आहेत. जगाच्या पाठीवर इतर देशांनी इव्हीएम नाकारलं असताना ते का याचा उद्घोष करत आहेत याचं उत्तर मोदींनी द्यावं. नसेल तर व्ही व्ही पॅटचे १०० टक्के मोजणी करावी आम्ही त्याला मान्यता देऊ' असे राऊत म्हणाले.

दरम्यान १३ डिसेंबर रोजी संसदेत सुरक्षा यंत्रणेला चकवा देत दोन तरूण शिरले होते. त्यावरून सभागृहात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावं अशी मागणी केली होती. याच मागणीवरून सभागृहात विरोधी पक्षांच्या खासदारांनी गोंधळ घातला. त्यावरूनच अध्यक्षांनी त्यांचे निलंबन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT