Team Agrowon
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) खा. संजय राऊत सध्या शरद पवार यांच्या बारामतीचा पाहुणचार घेत आहेत. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे चेअरमन राजेंद्रदादा पवार यांनी राऊत यांचे बारामतीत स्वागत केले.
बारामतीमध्ये होत असलेल्या शेतीविषयक विविध प्रकल्पांची माहिती संजय राऊत यांनी राजेंद्र पवार यांच्याकडून जाणून घेतली.
राऊत यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स डेअरी, कृषि विज्ञान केंद्र, सायन्स पार्क आणि अटल इन्क्युबेशन सेंटरची पाहणी केली.
भारतातील पहिल्या देशी गोवंश सुधारणा प्रकल्पालाही संजय राऊत यांनी भेट देत प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.
कृषी क्षेत्रातील विविध संशोधने आणि प्रयोगांची माहिती घेण्यासाठी देशासह जगभरातून राजकीय नेते, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ येथे येत असतात.
गेल्या काही वर्षातील बारामतीचा विकास पाहून राऊत भारावून गेले. शेती क्षेत्रातील संशोधन आणि प्रयोग समजून घेण्यासाठी राऊत बारामती दौऱ्यावर आले होते.
कृषि क्षेत्राशी संबंधित विविध संशोधन प्रकल्प पाहून त्यांनी समाधान व्यक्त करत शरद पवार यांचे काम पाहिल्यानंतर गर्व वाटतो, अशी भावना राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.