Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : पाणीटंचाईने घेतला माय-लेकीचा बळी

Water Shortage : मालेगाव तालुक्यातील झोडगे गावाशेजारी असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा पाय घसरून विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ४) दुपारी घडली.

मुकूंद पिंगळे

Nashik News : मालेगाव तालुक्यातील झोडगे गावाशेजारी असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा पाय घसरून विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ४) दुपारी घडली. नीताबाई जाधव व इच्छामणी जाधव अशी मृत माय-लेकीची नावे आहेत. पाणीटंचाईने माय-लेकीचा बळी घेतला.

झोडगेसह परिसराला सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. वीस दिवसांनंतर या ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते. अशा वेळेस महिलांना गाव परिसरातील विहिरींवर कपडे धुण्यासाठी जावे लागते; तर पशुपालक शेती शिवारातील विहिरींवर जाऊन जनावरांची तहान भागवत असतात.

या परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने दोर-बादलीच्या सहाय्याने विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. गुरुवारी दुपारी नीताबाई बाळू जाधव (वय ४७) व मुलगी इच्छामणी जाधव (१६) या दुपारच्या सुमारास विहिरीवर गेल्या असता पाणी काढत असताना त्यांचा पाय घसरून दोघी विहिरीत पडल्या. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला.

सायंकाळच्या सुमारास पशुपालक घराकडे येत असताना विहिरीत बुडालेल्या माय-लेकी दिसून आल्या. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना कळविले. ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

या वेळी पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस नाईक सतीश मोरे, पोलीस शिपाई मयूर भावसार, राऊत, तलाठी सुधीर कदम आदींनी घटनास्थळी जाऊन माय-लेकीला विहिरीतून बाहेर काढत मालेगाव येथे सामान्य रुग्णालय पाठविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. नीताबाई जाधव या कोतवाल शिवाजी जाधव यांच्या मातोश्री, तर इच्छामणी जाधव बहीण होत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Prices: सोयाबीन ठरणार ‘गोल्डन बीन’

India Rice Export: ‘यूएसडीए’ने घटवला भारतीय तांदूळ निर्यातीचा अंदाज

Global Economy: जागतिक विकासदर घटण्याचा अंदाज

Delhi Protest Restrictions: पोलिस दिल्लीचे आणि मुंबईचे...

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

SCROLL FOR NEXT