Water Crisis : आजऱ्यात १५ गावे, अकरा वाड्यांवर पाणीटंचाईची शक्यता

Water Issue : आजरा तालुक्यातही यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तालुक्याच्या टंचाई आराखड्यात १५ गावे व ११ वाड्यांचा समावेश केला आहे.
Water Issue
Water IssueAgrowon

Kolhapur News : आजरा तालुक्यातही यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तालुक्याच्या टंचाई आराखड्यात १५ गावे व ११ वाड्यांचा समावेश केला आहे. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेता कूपनलिका व खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. यासाठी २३ लाख ४० हजारांचा प्रस्तावही तयार केला आहे.

तालुक्यात पावसाची टक्केवारी घटली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून दररोज तालुक्याचा पिण्याच्या पाण्याबाबत आढावा घेतला जात आहे. आतापासूनच उपाययोजना राबविल्या जात आहेत. संबंधित गावातील कूपनलिका व विंधन विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असून २३ लाख रुपये यासाठी खर्च अपेक्षित आहे.

Water Issue
Water Crisis : आदिवासी पाडे टँकरच्या प्रतीक्षेत

मुमेवाडी, वझरे, वाटंगी, मलिग्रे, चव्हाणवाडी, शृंगारवाडी, हाळोली, किणे, चितळे, महागोंड, आरदाळ, चाफवडे, हरपवडे, शेळप व पारपोली या गावांमध्ये तर चितळे पैकी जेऊर, भावेवाडी, धनगरवाडा, हाळोली पैकी दर्डेवाडी, किणेपैकी चाळोबावाडी, महागोंडपैकी महागोंडवाडी, शृंगारवाडी उचंगी पैकी हुडा,

Water Issue
Water Issue : सोलापूर जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण

कोवाड पैकी दाभेवाडी, मलिग्रे पैकी कागिनवाडी, वझरे पैकी घागरवाडी, पारपोली पैकी खेडगे या वाड्यावर पाणीटंचाईची शक्यता आहे. ग्रामस्थांनी हिरण्यकेशी नदीच्या पात्रात मातीचा बांध उभारून पाणी अडवले आहे. यासाठी सरपंच भारती कृष्णा डेळेकर, शेतकरी व ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती कुठेही नाही. यंदा पाऊस कमी झाल्याने टंचाईच्या झळा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावे व ११ वाड्यांचा टंचाई आराखड्यात समावेश केला आहे.
एम. व्ही. तिवले, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग- ४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com