Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पीक नुकसानीबाबत साडेचार लाखांवर पूर्वसूचना प्राप्त

Crop Insurance : जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत एकूण ४८७८३४ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दिल्या आहेत.

Team Agrowon

Jalna News: जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीबाबत एकूण ४८७८३४ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दिल्या आहेत. त्यानुषंगाने युनिव्हर्सल सोंपो जनरल इंन्शुरन्स कंपनीस पीकविमा रक्कम तत्काळ शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी जालना डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी या तक्रारी केल्या आहेत.

शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर सर्वेक्षणाचे काम विमा कंपनीकडून करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारचा हप्ता प्राप्त झाल्यानंतर विमा परतावा देण्यासंदर्भात विमा कंपनीकडून तत्काळ प्रभावाने पावले उचलणे अपेक्षित असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. जालना जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर दरम्यानचे सरासरी पर्जन्यमान ६०३.१ मिलिमीटर आहे. २०२४-२५ मध्ये ८१२.४ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे.

त्याची टक्केवारी सरासरीच्या तुलनेत १३४.९ आहे. जालना जिल्ह्याचे सप्टेंबरचे सरासरी पर्जन्यमान १४१.८ मिलिमीटर असून सप्टेंबर २०२४-२५ मध्ये २२१६.९ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. त्याची टक्केवारी सरासरीच्या तुलनेत १६०.१ आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, फळपिकांचे मिळून एकूण २ लाख ५५ हजार ५१९.९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे.

त्यानुसार २ लाख ८२ हजार ५३८ शेतकऱ्यांना ४१२.३० कोटी रुपयांच्या नुकसान अनुदानाबाबतची मागणी शासनास करण्यात आली असल्याचेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT