Nanded News : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीक विमाधारक शेतकऱ्यांनी जिल्ह्यात १ ते ९ सप्टेंबर या काळात ऑनलाइन साडेसात लाख पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. यात संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला तसेच संबंधित कर्मचाऱ्यांकडे दाखल झालेल्या ऑफलाइन सूचनांचा समावेश नसल्यामुळे या सूचनांचा आकडा आणखी वाढणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.
नांदेड जिल्ह्यात १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी होऊन खरिपातील पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासोबतच बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. नदी-नाल्यांलगत असलेल्या जमिनी पुरामुळे खरडून गेल्या. प्रशासनाने पीक विमाधारक शेतकऱ्यांना कंपनीकडे नुकसानीबाबत पूर्वसूचना देण्याचे आवाहन केले होते.
यानुसार जिल्ह्यातील १६ तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीने सुचविलेल्या टोल फ्री नंबर, क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून सात लाख ४९ हजार ४९९ ऑनलाइन पूर्वसूचना दाखल केल्या आहेत.
यासोबतच ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने सूचना देता आल्या नाहीत अशासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित गावचे कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात नुकसानीबाबत लेखी कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून अशा लेखी सूचना आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. या सूचनांची गोळी बेरीज करण्याचे काम सध्या सुरू आहे.
तालुकानिहाय दाखल ऑनलाइन पूर्वसूचना
अर्धापूर २४,२४५, भोकर ५०,०२४, देगलूर ५५,१६३, धर्माबाद २५,३१५, हिमायतनगर ३२,५८३, कंधार ७०,३४९, किनवट ५०,२०४, लोहा ७५,१४७, माहूर २२,१९१, मुदखेड २५,०९६, मुखेड ८४,१६८, नायगाव ५९,८७२, नांदेड ३२,९१३ व उमरी ३४,०३१.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.