Fertilizers Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Fertilizer Supply: खरिपासाठी ४६ लाख टनांहून अधिक खतांचा पुरवठा होणार

Kharif 2025 Fertilizer Plan: खरीप हंगामासाठी केंद्र शासनाने राज्याकरिता ४६ लाख टनांहून अधिक रासायनिक खतांचा पुरवठा करण्यास मान्यता दिल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

मनोज कापडे

Pune News: खरीप हंगामासाठी केंद्र शासनाने राज्याकरिता ४६ लाख टनांहून अधिक रासायनिक खतांचा पुरवठा करण्यास मान्यता दिल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

खरीप हंगाम २०२५ मधील खत पुरवठ्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. येत्या सात व आठ एप्रिल रोजी खरीप हंगामाच्या राज्यस्तरीय बैठकीत या नियोजनाचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. साधारणतः १५.५२ लाख टन युरिया, ४.६ लाख टन डीएपी, १.२० लाख टन एमओपी, ७.५० लाख टन एसएसपी आणि १८ लाख टनांच्या आसपास संयुक्त खतांचा पुरवठा होणार आहे. गेल्या ३-४ वर्षांमधील खरीप हंगामात वापरल्या गेलेल्या एकूण खतांपेक्षाही यंदाचा मंजूर पुरवठा जास्त आहे. त्यामुळे खतांची कुठेही टंचाई भासणार नाही, असा दावा कृषी विभागाच्या सूत्रांनी केला आहे.

रासायनिक खतांचा पुरवठा मुबलक होणार असला तरी कृषी विभागाने दुसऱ्या बाजूला सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्याचाही सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर यांच्या म्हणण्यानुसार, रासायनिक खतांचा वापर करण्याआधी शेतकऱ्यांनी शेतामधील माती आणि विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याचे परीक्षण करणे अत्यावश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी पीकनिहाय रासायनिक खतांच्या शिफारशी केल्या आहेत. शिफारशींपेक्षा जादा खते दिल्यास पिकाचे आणि जमिनीचेही नुकसान होते. उलट रासायनिक खते कमी वापरून सेंद्रिय व जैविक खते तसेच नॅनो खतांचा वापर वाढविण्याची गरज आहे.

दरम्यान, राज्याच्या कृषी आयुक्तालयाने केंद्रीय कृषी मंत्रालयाला पत्र पाठवून खरिपाच्या तोंडाला म्हणजेच जूनमध्ये सर्वाधिक खतांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. ‘राज्याला एप्रिलमध्ये ३.५० लाख टन व मे ५.५२ लाख टन खत पुरवावे. मात्र, एप्रिलमधील पुरवठा ११.२३ लाख टनाच्या पुढे व्हावा. जुलैत १०.३६ लाख टन, ऑगस्टमध्ये ८.८६ लाख टन तर हंगाम समाप्तीच्या कालावधीत म्हणजेच सप्टेंबरमध्ये ७.३५ लाख टन खते पुरवावीत,’ असे राज्याने केंद्रीय कृषी मंत्रालयाला कळविले आहे.

काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई

रासायनिक खतांची जादा दराने विक्री, लिंकिंग किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांचे नियोजन करण्यात आले आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनीही अनोळखी किंवा अचानक बाजारात दिसणाऱ्या नव्या कंपन्यांचा माल घेण्यापूर्वी खात्री करावी. गैरप्रकार दिसताच कृषी विभागाकडे पुराव्यासह तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT