Fertilizer Demand : खरिपासाठी १ लाख ५९ हजार टन रासायनिक खतांची मागणी

Fertilizer Stock : येत्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात सुमारे पावणेपाच लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्यात सरासरी खतांचा वापर ९६ हजार टन आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यासाठी यंदाच्या (२०२५) खरीप हंगामात (एप्रिल ते सप्टेंबर कालावधी) महिनानिहाय विविध ग्रेडच्या रासायनिक खतांची गरज लक्षात घेऊन एकूण १ लाख ५९ हजार ७५० टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी दिली.

येत्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात सुमारे पावणेपाच लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्ह्यात सरासरी खतांचा वापर ९६ हजार टन आहे. त्यानुसार विविध ग्रेडच्या १ लाख ५९ हजार ७५० टन रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविली आहे.

त्यात एप्रिल आणि मे महिन्यांसाठी प्रत्येकी ३९ हजार ९३८ टन खतांची मागणी असून, त्यात युरिया १४ हजार ५० टन, डीएपी ५ हजार ९२५ टन, पोटॅश १ हजार ५०० टन, संयुक्त खते-एनपीके १४ हजार ६६३ टन, सिंगल सुपर फॉस्फेट ३ हजार ८०० टन खतांचा समावेश आहे. जून आणि जुलै महिन्यांसाठी प्रत्येकी २३ हजार ९६३ टन खतांची मागणी असून, त्यात युरिया ८ हजार ४३० टन, डीएपी ३ हजार ५५५ टन, पोटॅश ९०० टन, संयुक्त खते-एनपीके ८ हजार ७९८ टन, सिंगल सुपर फॉस्फेट २ हजार २८० टन खतांचा समावेश आहे.

Fertilizer
Soil Fertility : जमिनीचा सामू, ईसी, सेंद्रिय कर्ब माहीत असण्याचे फायदे

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांसाठी प्रत्येकी १५ हजार ९७५ टन खतांची मागणी असून, त्यात युरिया ५ हजार ६२० टन, डीएपी २ हजार ३७० टन, पोटॅश ६०० टन, संयुक्त खते-एनपीके ५ हजार ८६५ टन, सिंगल सुपर फॉस्फेट १ हजार ५२० टन खतांचा समावेश आहे.

Fertilizer
Interview with Dr. B. V. Mehta : सोयाबीनचा तिढा निश्‍चितच सुटू शकतो...

गतवर्षीच्या (२०२४) खरिपात १ लाख ५९ हजार ३०० टन रासायनिक खतांची मागणी केली होती त्या वेळी कृषी आयुक्तालयाने विविध ग्रेडच्या १ लाख २३ हजार ३०० टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला होता. त्यात युरिया २८ हजार २०० टन, डीएपी २४ हजार २०० टन,पोटॅश-एमओपी २ हजार ३०० टन, सुपर फॉस्फेट १८ हजार ८०० टन, संयुक्त खते-एनपीके ५३ हजार ८०० टन या खतांचा समावेश होता.

परभणी जिल्हा खरीप २०२५ एकूण खते मागणी स्थिती (टनांमध्ये)

खताचा प्रकार मागणी

युरिया ५६२००

सुपर फॉस्फेट १५२००

पोटॅश ६०००

डीएपी २३७००

एनपीके ५८६५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com