Agricultural Commodities: अमेरिकेत सोयातेलाचा वापर केवळ खाद्यतेलापुरता मर्यादित न राहता जैवइंधन उद्योगासाठी वेगाने वाढत आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (यूएसडीए) जून २०२६ च्या अहवालानुसार, एप्रिल २०२६ मध्ये वापरण्यात आलेल्या एकूण ८.८६ लाख टन सोयातेलापैकी ३.१८ लाख टन, म्हणजेच ३५.९ टक्के सोयातेल ‘रिन्यूएबल डिझेल’ आणि ‘सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूएल’ (एसएएफ) निर्मितीसाठी वापरण्यात आले..ही वाढ केवळ एखाद्या महिन्यापुरती मर्यादित नव्हती, तर गेल्या वर्षभरात जैवइंधन उद्योगाकडून सोयातेलाची मागणी सातत्याने मजबूत राहिली आहे. एप्रिल २०२५ मध्ये ३.०१ लाख टन, तर मार्च २०२६ मध्ये २.९९ लाख टन सोयातेल जैवइंधन निर्मितीसाठी वापरण्यात आले होते. त्यामुळे अमेरिकेतील एकूण सोयातेल वापरामध्ये जैवइंधन क्षेत्राचा वाटा सातत्याने एकतृतीयांशच्या आसपास स्थिर असल्याचे दिसून येते..Soybean Production Improvement: आगामी हंगाम सोयाबीन उत्पादनात सुधारणेचा.जैवइंधन क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे अमेरिकेतील सोयाबीन प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळाली आहे. एप्रिल २०२६ मध्ये ५९.४५ लाख टन सोयाबीन गाळप करण्यात आले. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ८ टक्क्यांनी अधिक आहे. या गाळपातून ११.४९ लाख टन कच्च्या सोयातेलाचे उत्पादन झाले..सोयातेलाबरोबरच कॅनोला तेलाचाही जैवइंधन उद्योगातील वापर वाढत आहे. एप्रिल २०२६ मध्ये अमेरिकेतील कॅनोला गाळप १.८४ लाख टनांवर पोहोचले, जे मागील वर्षाच्या तुलनेत २६ टक्क्यांनी जास्त आहे. जैवइंधन क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन तेलबिया प्रक्रिया उद्योगात क्षमता विस्तार सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होते..Soybean Seeds Availability: खरिपासाठी घरगुती सोयाबीन बियाण्याचा मोठा साठा उपलब्ध.सोयाबीन गाळप वाढल्यामुळे सोयापेंड उत्पादनातही वाढ झाली आहे. एप्रिल २०२६ मध्ये अमेरिकेत ४४.०४ लाख टन सोयापेंडचे उत्पादन झाले. हे मागील वर्षाच्या तुलनेत ७.६ टक्क्यांनी अधिक आहे. मात्र महिनाअखेरीस सोयापेंडचा साठा ३.१५ लाख टनांवर राहिला, जो एप्रिल २०२५ मधील ३.५४ लाख टनांच्या तुलनेत कमी आहे. उत्पादन वाढूनही साठ्यात झालेली घट बाजारातील मजबूत मागणीचे संकेत देत आहे..तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील जैवइंधन क्षेत्राकडून वाढणारी सोयातेलाची मागणी जागतिक खाद्यतेल बाजाराला आधार देणारी ठरू शकते. परिणामी, सोयातेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींना बळ मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे, वाढत्या सोयाबीन गाळपामुळे अमेरिकेतील सोयापेंड उपलब्धता वाढत असून जागतिक बाजारात भारतीय सोयापेंड निर्यातीसमोर स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..परिणाम काय ? सकारात्मकजागतिक सोयातेल किमतींना आधार मिळू शकतो.तेलबिया क्षेत्रातील गुंतवणूक आणि प्रक्रिया उद्योगाला चालना.नकारात्मकअमेरिकेतील वाढत्या सोयापेंड उपलब्धतेमुळे भारतीय निर्यातदारांपुढे स्पर्धा वाढू शकते.जागतिक बाजारात सोयापेंडच्या दरांवर दबाव येण्याची शक्यता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.