Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनची आर्द्रता बारा टक्के असावी

Soybean Rate : विक्रीसाठी आणण्यात येणाऱ्या एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनची आर्द्रता १२ टक्क्यांपर्यंत असावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

Team Agrowon

Nanded News : केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एनसीसीएफच्या वतीने जिल्हा को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून नांदेड जिल्ह्यात हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे.

यासाठी २० खरेदी केंद्रे निश्‍चित केले आहेत. विक्रीसाठी आणण्यात येणाऱ्या एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनची आर्द्रता १२ टक्क्यांपर्यंत असावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

जिल्ह्यात मूग, उडीद खरेदी ता. १० ऑक्टोबर व सोयाबीन खरेदी ता. १५ ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे. यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून वीस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणताना एफएक्यू दर्जाचे तसेच त्यातील आर्द्रतेचे प्रमाण बारा टक्के असावी, अशी आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

जिल्ह्यात पणनकडून मुखेड तालुका खरेदी विक्री संघ, मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, लोहा तालुका खरेदी विक्री संघ लोहा, कृषी उत्पन्न बाजार समिती, किनवट, तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाळ उपाध्याय अभिनव सह. संस्था, देगलूर, मष्णेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. धनज, ता. मुखेड, सिद्राम फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. बेटमोगरा, ता. मुखेड, किनवट तालुका कृषिमाल प्रक्रीया सह. संस्था गणेशपूर, ता. किनवट,

तिरुपती शहापूर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. वन्नाळी, ता. देगलूर, राधामाई फार्मर प्रोड्यूसर कंपनी, रातोळी, ता. नायगाव, अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा, ता. हदगाव, श्रीजगदंब फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. जांब बु., ता. मुखेड, नांदेड जिल्हा फळे व भाजीपालासह खरेदी-विक्री संस्था नांदेड, ता. अर्धापूर, कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कुंडलवाडी, ता. बिलोली,

बळिराम पाटील फळे व भाजीपाला प्रक्रिया सहसंस्था मुखेड बेरली खुर्द, ता. मुखेड, मुखेड फळे व भाजीपाला उत्पादक सहसंस्था उमरदरी, ता. मुखेड, जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सहकारी संस्था कौठा, ता. कंधार, नांदेड प्रगती ग्रो प्रोड्युसर कंपनी चेनापूर, ता. धर्माबाद, स्वामी विवेकानंद अभिनव सहकारी संस्था मर्या शेळगावथडी, ता. धर्माबाद याठिकाणी मूग, उडीद, सोयाबीन ऑनलाइन शेतकरी नोंदणीसह खरेदी सुरू झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari Irrigation Reform: थकबाकी वसुली, स्वायत्तता अजेंड्यावर

Well Approval Irregularities: पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी दिली परस्पर ३७ विहिरींना मंजुरी

Grape Vineyard Destroyed: उभ्या द्राक्ष बागेवर माथेफिरूकडून कुऱ्हाड

Transport Business Issue: ट्रान्सपोर्ट व्यवसाय ‘व्हेंटिलेटर’वर

Tree Cutting Ban: नाशिकमध्ये वृक्षतोडीला २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT