PM Narendra Modi Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Sector : डेअरी क्षेत्रात ६ टक्के वाढ झाल्याचा मोदींचा दावा|कापूस-सोयाबीन दरावरून वड्डेटीवारांची जोरदार | राज्यात घडलं?

भारतातील डेयरी क्षेत्राची उलाढाल १० लाख कोटींच्या पुढे गेल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

Dhananjay Sanap

शंभू आणि खनौरी सीमेवर कँडल मार्च  

शंभु आणि खनौरी सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज १२ दिवस आहे. शनिवारी संध्याकाळी सीमेवर शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ कँडल मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चाने दिलीय. तसेच २६ फेब्रुवारी रोजी डब्ल्युटी वर चर्चा होणार आहे. त्यासाठी २५ फेब्रुवारीला शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी संघटना चर्चा करतील. तर २९ फेब्रुवारी रोजी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती सर्वण सिंग पंढेर यांनी दिली. 

डेअरी क्षेत्रात ६ टक्के वाढ - पंतप्रधान

भारतातील डेयरी क्षेत्राची उलाढाल १० लाख कोटींच्या पुढे गेल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. गुरुवारी ते गुजरात सहकारी दूध संघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात बोलत होते. मोदी म्हणाले, भारताचं डेयरी क्षेत्र झपाट्यानं वाढत आहे. जगातील डेयरी क्षेत्र २ टक्क्यांनी वाढत असतात भारताचे डेयरी क्षेत्र ६ टक्क्यांनी वाढत आहे. भारतातील डेअरी क्षेत्राची उलाढाल १ हजार २०० कोटींच्या घरात असल्याचा दावाही पंतप्रधान मोदींनी केला.

मराठा समाजाकडून रास्ता रोको

सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणीसाठी राज्यात गावोगावी सकाळी १०:३० ते दुपारी १ वाजता रास्तारोको करण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केलं होतं. शनिवारी राज्यातील विविध भागात मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला. नांदेड, हिंगोली, बीड, सोलापूर, जालना, धाराशिव या जिल्ह्यात गावोगावी रास्ता रोको करण्यात आला. तर काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. विविध ठिकाणी आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा प्रकार घडल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. 

कापूस-सोयाबीनवरून वड्डेटीवारांची सरकारवर टीका

थोडे तरी सरकारनं शेतकऱ्यांचं वास्तव डोळे उघडे ठेवून पाहिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन पिकाला दर मिळत नाहीत, हीच का मोदींची गॅरंटी, असा प्रश्न उपस्थित करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन घरात पडून आहे, असंही वड्डेटीवार म्हणाले. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी वड्डेटीवार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT