Paddy Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Plantation : भातलागवडीच्या क्षेत्रात २४ हेक्टरने वाढ

Paddy Farming : आधुनिक तंत्राचा वापर करून परिस्थितीनुसार शेती पद्धतीत बदल केल्याने जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा २४ हेक्टरने भातलावणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Palghar News : आधुनिक तंत्राचा वापर करून परिस्थितीनुसार शेती पद्धतीत बदल केल्याने जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा २४ हेक्टरने भातलावणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे आधुनिक शेतीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याला सुगीचे दिवस आले आहेत.

जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात यांत्रिकीकरण, भात ट्रे रोपवाटिका, राबविरहित भातलागवड, सगुणा तंत्रज्ञान, चारसूत्री तंत्रज्ञान, टोकन पद्धतीने भातशेती केली जात आहे.

या पद्धतींमुळे लागवड क्षेत्र सुमारे ९५ हेक्टर झाले आहे. २०२३-२४ मध्ये सरासरी ७६ हजार ६४४ हेक्टर क्षेत्र भातलागवडीखाली होते, परंतु २०२४-२५ मध्ये २४ हेक्टरने वाढ होत ७६ हजार ६६८ वर पोहोचले आहे.

२०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा हा यांत्रिकीकरणाकडे असून, भातलागवड क्षेत्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यामध्ये सरासरी १३ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रावर भातलावणी करण्यात येते. तालुक्यात ११२ टक्क्यांवर हे प्रमाण गेले असून, १५ हजार ६३५ हेक्टर परिसरात लावणी करण्यात आली आहे.

हवामान बदलावर ‘सगुणा’ तंत्रज्ञान

नांगरणी, चिखलणी व लावणी करावी लागत नसल्यामुळे खर्च ५० ते ६० टक्क्यांनी कमी होतो. भातकापणीसाठी आठ ते १० दिवस आधी तयार सगुणा तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन जमिनीमध्ये ग्रहण करता येतो. त्यामुळे जमिनीतला कर्ब वाढतो आणि हवेतील कर्ब कमी होतो. म्हणून हवामान बदलावर सगुणा तंत्र परिणामकारक उपाय ठरत आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

जव्हार, मोखाडा आणि डहाणू तालुक्यात भातलावणीचे क्षेत्र १०० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. चारसूत्री लावणीमध्ये युरिया डीएपीचा वापर केल्यामुळे खताची उपलब्धता जास्त कालावधीपर्यंत होते. खताच्या खर्चात बचत होते. भातपिकाच्या फुटव्यात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते. चारसूत्री तंत्र आत्मसात करण्यास सोपे, जमिनीचा पोत सुधारणारे, मजुरी व खतांचा खर्च कमी करणारे असल्याने भातशेती फायदेशीर आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातलावणीच्या वेळी जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आणि पाण्याची जलधारण क्षमता वाढविण्यासाठी चिखलणीच्या वेळेला भात खाचरात गिरीपुष्प, ताग, धैंचा, अशा हिरवळीच्या वनस्पतींच्या पाल्याचा अवलंब करावा. जेणेकरून जमिनीचे आरोग्य टिकून राहील तसेच जमिनीला नत्राचा पुरवठादेखील होऊ शकेल.
- डॉ. अमोल दहिफळे, प्रमुख, कृषी संशोधन केंद्र, पालघर
भातपिकासाठी पेरणी, लावणी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन आणि कापणी योग्यवेळी केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापरावर भर देण्याची गरज आहे.
- डॉ. विलास जाधव, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल, डहाणू
शून्य मशागत तंत्रज्ञान यंत्राच्या सहाय्याने भातलागवड, माती परीक्षणनुसार खतांचा वापर, भातकापणीसाठी रिपरचा वापर, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन यामुळे भातशेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केल्यास उत्पन्नात अधिक वाढ होईल.
- नीलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’विरोधात ‘चक्का जाम’

Sugarcane Productivity : ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ’ अभियानास कोल्हापुरात प्रारंभ

Agriculture Irrigation : गतवर्षीच्या तुलनेत सिंचनासाठी १६ टीएमसीने उपसा कमी

SCROLL FOR NEXT