Pune News: मुळशी तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी होळीच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करत शासनाचे सोमवारी (ता.२) आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाईजाहीर करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला..ढगाळ हवामानामुळे आंब्याचा मोहर पूर्णपणे जळून गेला असून चिकट्या व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना आंब्यापासून कोणतेही उत्पन्न मिळणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे..Government Employees Protest: भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन.तालुक्यात सुमारे साडेतीनशे हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. पूर्वीपासून हापूस आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणावर असून अलीकडील काही वर्षांत सघन पद्धतीने सुमारे एक लाख झाडांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. मुठा खोरे, कोळवण खोरे, तसेच पौड-माले परिसरात आंब्याची बागायती मोठ्या प्रमाणावर आहेत. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांचे आंबा हे प्रमुख आणि हमखास उत्पन्नाचे साधन मानले जाते..या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला सर्वत्र आंब्याला भरघोस मोहर आला होता. त्यामुळे चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात सतत ढगाळ वातावरण राहिल्याने मोहर जळून गेला. त्यातच चिकट्या व करपा रोग पडल्याने उरलेसुरले उत्पादनही धोक्यात आले. परिणामी आमचा मुख्य घास हिरावला गेला असून आर्थिक संकट ओढवले आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली..Farmers Protest: ‘संयुक्त किसान मोर्चा’चे देशव्यापी अभियान.या पार्श्वभूमीवर मुळशी तालुका शेतकरी संघाच्या वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. होळीचा मुहूर्त साधून शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर एकत्र येत घोषणाबाजी केली. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली..या वेळी तहसीलदार विजयकुमार चोबे यांना निवेदन देण्यात आले. संघाचे अध्यक्ष राजेंद्र मारणे यांच्यासह भाऊ केदारी, राम गायकवाड, अनंत ढमाले, संतोष साठे, रा. सु. शेलार, जयराम दिघे, एस. कळमकर, विठ्ठल गुजर, अजय पवळे, बापू गुजर, तानाजी तापकीर, बाळासाहेब गोडांबेआदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.