Importance of MSP in market stability: सक्षम स्थिर बाजारपेठेची निर्मिती आणि कृषी क्षेत्रातील जोखमींचे व्यवस्थापन यावर शासनाची निर्णायक भूमिका घेण्याची गरज आहे. उत्पादनाचे प्रमाण, अधिशेष आणि अपयश याबाबत बाजारातून मिळणारे संकेत हे शेकडो वर्षांपासून कृषी व्यवस्थेचा अविभाज्य भाग राहिले आहेत. त्यामुळे बाजारपेठेची स्थिरता ही कृषी विकासाची किल्ली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले..मुंबई येथे ‘एआय४ ॲग्री -२०२६’ या परिषदेच्या पहिल्या दिवशी (ता. २२) संस्थात्मक वित्तीय संरचनेद्वारे एआय फॉर अॅग्रीला गती देणारे ‘ट्रस्ट इंजिन’ या परिसंवादात सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक संजीव डी. रोहिल्ला, अॅक्यूमनचे सहयोगी संचालक पराग सभलोक, नेदरलँड्स दूतावासच्या कृषी सल्लागार श्रीमती मॅरियन व्हॅन शायक यांनी या परिसंवाद मध्ये सहभाग घेतला, तर या परिसंवादाचे समन्वयक म्हणून अन्न व कृषी संघटनेचे (एफएओ) वरिष्ठ धोरण सल्लागार रमन आहुजा यांनी संवाद साधला..Agricultural Market: शेतीमाल बाजाराची दिशा काय राहील?.जगातील सुमारे निम्मी लोकसंख्या आपला उदरनिर्वाह कृषी-अन्न प्रणालीवर अवलंबून असल्याने ती विविध नैसर्गिक व आर्थिक जोखमींना सामोरी जाते. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रातील जोखिम वाढत आहे. तिच्या व्यवस्थापनासाठी नावीन्यपूर्ण आर्थिक व तांत्रिक साधने विकसित करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. या प्रक्रियेत शासकीय उपक्रम, गुंतवणूकदार आणि उद्योजक यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले..मूल्यसाखळीतील सर्व घटकांच्या मानसिकतेत बदल आवश्यक असून, त्यासाठी उद्योजक दृष्टिकोन, वित्तीय उत्पादनांची नव्या पद्धतीने रचना आणि गुंतवणुकीची तयारी या बाबींवर भर देण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता या बदलाला चालना देऊ शकत असली, तरी डिजिटल पातळीसोबतच प्रत्यक्ष संवाद आणि मानवी भावनांचे महत्त्व कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले..Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे.नेदरलँड्सची कृषी नवोन्मेष मॉडेल भारतासाठी मार्गदर्शकनेदरलँड्समध्ये शासन, खासगी क्षेत्र आणि संशोधन संस्थांमधील सहकार्यामुळे कृषी क्षेत्रात प्रभावी काम झाले आहे. ‘सिलो’ पद्धतीऐवजी एकत्रित कामकाजावर भर दिल्यामुळे तंत्रज्ञानाचा वेगवान आणि परिणामकारक प्रसार झाला आहे. उत्पादक, लॉजिस्टिक्स, बँका आणि ग्राहक यांना एकत्र आणणारी ‘हब’ संकल्पना राबवली जाते. युरोपीय महासंघाच्या ‘होरायझन युरोप’ या उपक्रमामुळे नवकल्पनांच्या विस्तारासाठी निधी उपलब्ध होतो. भौगोलिक व हवामानातील फरक असूनही सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) आणि नवोन्मेष हब मॉडेल भारतातही प्रभावी ठरू शकते, असे मत नेदरलँड्स दूतावासच्या कृषी सल्लागार श्रीमती मॅरियन व्हॅन शायक यांनी व्यक्त केले..एआय तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी ठोस पुराव्यांची गरजगेल्या पंधरा वर्षांत सुमारे तीस हजार द्राक्ष उत्पादकांसोबत काम करताना ठिबक, आधुनिक फवारणी यंत्रे व आयओटी (IoT) उपकरणे स्वीकारली. तंत्रज्ञानामुळे खरेच फायदा होतो का, याचा अंदाज आल्याशिवाय शेतकरी त्यात गुंतवणूक करत नाहीत. कंपन्यांचे दावे कागदावर काही असले तरी प्रत्यक्ष यशस्वी शेतकऱ्यांचे उदाहरण आणि ‘पीअर व्हॅलिडेशन’ अधिक प्रभावी ठरते. एआय सारख्या तंत्रज्ञानामध्ये एफपीओ आणि तंत्रज्ञान पुरवठादार यांच्यात समन्वय साधण्याची गरज आहे. ऊस शेतीतील ‘आयओटी’ वापरामुळे उत्पादकता व गुणवत्ता वाढल्याची उदाहरणे यासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे मत ‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी व्यक्त केले..शाश्वत व्यवसायासाठी ‘एआय’कृषी माहिती क्षेत्रामध्ये मोठ्या भांडवली गुंतवणुकीची गरज आहे. अशा सेवांसाठी शासनाची भूमिका महत्त्वाची असून, भारत सरकारने ॲग्रीस्टॅक (AgriStack) आणि विस्टा (VISTA) सारख्या पायाभूत प्रणाली उभारून दूरदृष्टी दाखवली आहे. भविष्यात उपग्रह प्रतिमा, जमीन नकाशांकन आणि पीक नोंद यासारख्या क्षेत्रात एआयमुळे स्टार्टअप्सना अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचे मत अॅक्यूमनचे सहयोगी संचालक पराग सभलोक यांनी व्यक्त केले..धोरणात्मक संरचना, अर्थकारणआंध्र प्रदेशातील मत्स्यव्यवसायात आयओटी (IoT) प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न सर्व घटक उपलब्ध असूनही अपयशी ठरला. त्यामुळे तंत्रज्ञान, निधी आणि इच्छाशक्ती याबरोबरच अंमलबजावणीसाठी सक्षम प्रशासनिक रचना आवश्यक असते. एआय आणि कृषी सुधारणा हे व्यापक आर्थिक वास्तव आणि अर्थकारणाच्या चौकटीत पाहणे आवश्यक असल्याचे मत नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक संजीव डी. रोहिल्ला यांनी व्यक्त केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.