Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Vidharbha Rain : पश्‍चिम विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस

Rain Update : मागील काही दिवसांपासून या भागात पावसाने ठाण मांडले आहे. काही ठिकाणी दमदार, कुठे रिमझिम तर कुठे मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत.

Team Agrowon

Akola News : मागील काही दिवसांपासून या भागात पावसाने ठाण मांडले आहे. काही ठिकाणी दमदार, कुठे रिमझिम तर कुठे मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. मागील २४ तासांत पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यांत बहुतांश मंडलांमध्ये पावसाने हजेरी दिली. अकोल्यातील बार्शीटाकळी परिसरात सोमवारी (ता.१५) सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने काहीवेळ पुलांवरून पाणी वाहल्याने दोन मार्गही बंद राहले.

या विभागात यंदाच्या मोसमात जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. पावसाचा दीड महिना लोटला तरीही अशा स्वरूपाचा सार्वत्रिक जोरदार पाऊस झालेला नाही. सध्या भीज पाऊस होत असल्याने पिकांना फायदेशीर ठरतो आहे. उशिराने झालेल्या पेरण्यांना या पावसाने दिलासा दिला. शिवाय काही भागात १० दिवसांपेक्षा अधिक खंड पडलेला होता. त्या ठिकाणी पिकांना पाण्याची आवश्‍यकता निर्माण झाली होती. पाऊस आल्याने पिकांना फायदा होत आहे.

जिल्हा पडलेला पाऊस

अकोला १५ मिलिमीटर

बुलडाणा ९.२ मिलिमीटर

वाशीम १०.७ मिलिमीटर

बार्शिटाकळी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान

अकोला : जिल्ह्यात सरासरी १५ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. बार्शीटाकळी तालुक्यात अतिवृष्टीने १५ गावांतील पिकांचे नुकसान झाले. तालुक्यात सरासरी ३९.६ मिमी पाऊस झाला. त्यात बार्शिटाकळी मंडलात ९५ मिमी व राजंदा मंडलात ६५ मिमी पाऊस झाला. या तालुक्यात १५ गावांतील सुमारे १ हजार ३०४ हे.

क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. अकोला तालुक्यात १९.४ मिमी, अकोट तालुक्यात ६.८ मिमी, तेल्हारा तालुक्यात ११.७ मिमी, बाळापूर तालुक्यात ३.८ मिमी, पातूर तालुक्यात १३.७ मिमी, मूर्तिजापूर तालुक्यात ९.८ मिमी पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंमी एवढे उघडण्यात आले असून, १३.८८ घ.मी.प्र.से. एवढा विसर्ग पूर्णेच्या पात्रात होत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

Onion Farmers Issue: ‘बफर स्टॉक’चा कांदा शेतकऱ्यांच्या मुळावर

Sugarcane Transport Rule: ऊस वाहतुकीमध्ये बैलांना क्रूर वागवू नका; साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

SCROLL FOR NEXT