Crop Damage : पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Pre-Monsoon Rain : आतापर्यंत एप्रिल आणि मे महिन्यांच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत पूर्वमोसमी पावसाने सुमारे २ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
Banana Crop Damage
Banana Crop DamageAgrowon

Solapur News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने मोठा दणका दिला असून, अनेक भागांत शेतीपिकांचे या पावसाने नुकसान झाले आहे. आतापर्यंत एप्रिल आणि मे महिन्यांच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत पूर्वमोसमी पावसाने सुमारे २ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

यंदा कधी नव्हे, ते जिल्ह्याचे तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले. त्याशिवाय ते सर्वाधिक ४४ अंशापर्यंतही गेले. त्यामुळे एकीकडे प्रचंड ऊन, उकाडा आणि टंचाईच्या परिस्थितीला शेतकरी सामोरे जात असताना, दुसरीकडे पूर्वमोसमी पावसाने मोठा फटका शेतकऱ्यांना दिला. विशेषतः आंबा, डाळिंब, पेरू, पपई, केळी यांसारख्या फळबागायतदारांना त्याचा मोठी झळ सहन करावी लागली.

Banana Crop Damage
Crop Damage Survey : नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

या आधीच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, करमाळा, माळशिरस आणि सांगोला या पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पण निवडणुकांमध्ये हा दुष्काळ अदृश्य झाला. त्यानंतर पूर्वमोसमी पावसाच्या नुकसानीबाबतही तेच झाले.

Banana Crop Damage
Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास २ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पण त्यापैकी १६५० हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले, अद्यापही साडेतीनशे हेक्टरवरील पिकांचे पंचनामे बाकी आहेत. या आधीच दुष्काळाच्या नुकसानीसाठी मदतीची प्रतीक्षा होत असताना, आता पुन्हा पूर्वमोसमीच्या नुकसानीची प्रतीक्षाही शेतकऱ्यांच्या वाट्याला आली आहे.

मे महिन्यात साडेचारशे हेक्टरचे नुकसान

पूर्वमोसमी पावसामुळे एप्रिल महिन्यात सुमारे १५०० हेक्टरहून अधिक क्षेत्राला फटका बसला, त्यानंतर मे महिन्यामध्ये मागच्या आठवड्यात सुमारे साडेचारशे हेक्टरला फटका बसला. त्यात करमाळ्यात २८० हेक्टरचे नुकसान झाले. तर सांगोल्यात १६ हेक्टर, पंढरपुरात ३६ हेक्टर आणि माढ्यात ११५ हेक्टरचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com