Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस

Kharif Sowing : गेले आठ दिवस पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली होती. त्यामुळे पूर्व भागात कापूस, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांच्या अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दौंडमध्ये सोमवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत रावणगाव मंडलात ४४.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे वाढीच्या अवस्थेतील पिकांना दिलासा मिळाला असून, पश्चिम भागात भात रोपेही वाढीच्या अवस्थेत आहेत.

गेले आठ दिवस पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली होती. त्यामुळे पूर्व भागात कापूस, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर या पिकांच्या अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. काही ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यासाठी पावसाची प्रतीक्षा लागून होती. पश्चिम पट्ट्यांतही अनेक शेतकऱ्यांनी भात रोपे टाकली होती.

काही ठिकाणी शेतकऱ्यांनी एसआरटी पद्धतीने थेट बियाणे टाकले आहे. मात्र, अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे भात उगवून आला आहे. परंतु पाऊस नसल्याने रोपे अडचणीत येत असताना पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. मागील दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.

सध्या सकाळपासून काही अंशी ढगाळ वातावरण असले तरी अधूनमधून हलका पाऊस बरसत आहे. रविवारी (ता.२३) दुपारनंतर अचानक अनेक ठिकाणी पाऊस पडला. हवेलीतील खेड शिवापूर मंडलात ३८.५ मिलिमीटर तर भोसरी २८.०, थेऊर २८.५, वाघोली २२.३, अष्टापूर १०.५ मिलिमीटर पाऊस पडला. तर पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, उरुळीकांचन, चिंचवड, कळस, हडपसर परिसरात तुरळक पाऊस पडला. मुळशी तालुक्यातही हलक्या सरी कोसळल्या.

भोरमधील आंबवडे येथे १५.८ मिलिमीटर, वेळू येथे १३.३ मिलिमीटर पाऊस पडला असून भोर, भोलावडे, नसरापूर, किकवी, संगमनेर, निगुडघर येथे पावसाचा शिडकावा झाला. मावळमधील तळेगाव २०.३, खेडमधील पिंपळगाव १६.५, आंबेगावमधील कळंब २९.०, मंचर २३.३, शिरूरमधील शिरूर ३८.८ मिलिमीटर, कोरेगाव १२.०, इंदापुरातील भिगवण ११.०, इंदापूर १५.५, बावडा २६.५, दौंडमधील देऊळगाव २४.५, केडगाव ३७.०, वरवंड १३.३, दौंड २६.०, बोरी पार्धी ४०.० मिलिमीटर, पुरंदरमधील भिवंडी १२.३, राजेवाडी १९.५ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे खरीप पेरण्या वेगात सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT