Rain Update
Rain UpdateAgrowon

Rain Update : कोकणात जोर ओसरला

Monsoon Rain : गेले दोन दिवस कोकणात धुव्वाधार पाऊस बरसल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला आहे.
Published on

Pune News : गेले दोन दिवस कोकणात धुव्वाधार पाऊस बरसल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला आहे. घाटमाथ्यावरही हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत रविवारी (ता. २३) तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडला. सिंधुदूर्गमधील पेंडूर मंडलात ९४.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात हलका पाऊस पडला. रायगडमधील नाटे मंडलात ५४, तर रत्नागिरीतील पालगड ६२.३, सिंधुदुर्गमधील श्रावण ६६.३, कसाल ६५.५, पिंगुळी ५७.५, मालवण ५३.३, वालावल ५१.०, कुडाळ ५०.५ मिलिमीटर पाऊस पडला. पालघरमधील बोईसर ६३.८, तारापूर ६३.८ येथे मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे कोकणातील धरणांतील पाणी पातळीत काहीशी वाढ झाली आहे.

Rain Update
Rain Update : अकोला जिल्ह्यात पावसाची अखेर हजेरी

खानदेशातील नंदूरबार जिल्ह्यातील खोंडामळी, रनाळा ६५.८, आष्टे ६५.३ मिलिमीटर, तर नंदूरबार, धानोरा, तळोदा, मोलगी मंडलात हलका पाऊस पडला. नगरमधील बाभळेश्वर मंडलात ४२.३, साताऱ्यातील मायणी मंडलात ६२.३ मिलिमीटर, तर निमसोड, कातरखटाव मंडळात हलका पाऊस पडला. सांगलीतील कुची, कवठेमहांकाळ, हिंगणगाव, कोल्हापुरातील शिरोळ मंडलात हलका पाऊस पडला. उर्वरित भागात पावसाने उघडीप दिली होती.

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने पेरण्या वेगात सुरू आहेत. तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना दिलासा मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल, डोणगाव मंडलात ४६.८, जालन्यातील सिपोरा मंडलात ४९.५, बीडमधील लोखंडी ४१.५, बदरापूर ५३.०, लातूरमधील जातेगाव ४४.३, पोहरगाव, पानगाव, कारेपूर ५४.५, परभणीतील माखणी ५५.३ मिलिमीटर तर गंगाखेड, महातपुरी, राणीसावरगाव येथे हलका पाऊस पडला. त्यामुळे कापूस, सोयाबीन पिकांना आधार मिळाला.

Rain Update
Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १९५ पैकी १०६ मंडलांत पावसाची हजेरी

विदर्भातील बुलडाण्यातील रोहीनखेड, शेलापूर बु, शेंबा, निमगाव, महाळुंगी मंडलात हलका पाऊस पडला. अकोला जिल्ह्यातील मध्यम पाऊस पडला. अमरावतीतील भातकुली मंडलात ६२.५, निंभा, असरा ६४ मिलिमीटर पाऊस झाला. वर्ध्यातील विजय गोपाल, सिरसगाव, नागपूरमधील मेंधळा, कळमेश्‍वर मध्यम, तर गोंदियातील सालकेसा ५९, शिखारीटोळा ५२.३, आमगाव खुर्द ५९ मिलिमीटर चंद्रपूरमधील गोंडपिंपरी ६६.३, धाबा ५८.० येथे मिलिमीटर पाऊस बरसला.

गडचिरोलीतील बामणी मंडलात ६२.०, चामोर्शी ५०.८ मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे विदर्भात पेरण्यांना वेग येत असला तरी अजूनही काही ठिकाणी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

रविवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस पडलेली मंडले : स्त्रोत - कृषी विभाग

मसूरे ७१.०, शनिमांडळ ७१.३, अक्कलकुवा ७७.५, वडफळी ७५.३, बोरी ९३.५, शिरोली ७४.०, शिवणी, घोटी ७४.०, जलालखेडा ७९.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com