Rain Update : अकोला जिल्ह्यात पावसाची अखेर हजेरी

Monsoon Rain : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षित असलेला पाऊस अखेर मागील २४ तासांत जिल्ह्यात बऱ्याच भागात झाला.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Akola News : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षित असलेला पाऊस अखेर मागील २४ तासांत जिल्ह्यात बऱ्याच भागात झाला. प्रामुख्याने बार्शीटाकळी, पातूर, अकोला या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.

बार्शीटाकळी तालुक्यात सर्व मंडलांमध्ये पावसाने दमदार हजेरी दिली. यात महान मंडलात २५.३, राजंदा ३८, धाबा ५४.८, खेर्डा १९.५, बार्शीटाकळी २४.५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. अकोट तालुक्यातील सर्वच मंडलांमध्ये पाऊस झाला. मात्र, पावसाचा जोर कमी होता.

Rain Update
Maharashtra Rain : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस

मुंडगाव मंडलात ५.५, पणज ८.५, चोहोट्टा ५.८, कुटासा ७, आसेगाव बाजार १२.३, उमरा १७, अकोलखेड १०.८ आणि अकोटमध्ये १२.३ मिलिमीटर पाऊस झाला. तेल्हारा तालुक्यात हिवरखेड मंडलात ३०.३ मिलिमिटर सर्वाधिक पाऊस झाला. बाळापूर तालुक्यात उरळ बुद्रुक मंडलात २२, निंबा ३४.८, हातरूण ६.८, बाळापूर ३३ मिलीमिटर नोंद आहे.

Rain Update
Rain Update : पावसाची उघडीपीने चिंता; पिकांना सोडले पाणी

पातूर तालुक्यात बाभूळगाव मंडलात २८.८, सस्ती २६.५, पातूर २७.७, अकोला तालुक्यात अकोला १२.८, उगवा २८.५, आगर १८.८, बोरगाव १२, पळसो १०.५, सांगळूद ४६.५, कौलखेड १०.३ मिलिमिटर पावसाची नोंद झालेली आहे. हा पाऊस पेरणीच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यात खारपाण पट्‍ट्यात पुरेसा पाऊस आजवर झालेला नसल्याने पेरणीचे काम रखडलेले आहे.

मूर्तिजापूरमध्ये गरज

मागील २४ तासांत जिल्ह्यातील बहुतांश तालुके व मंडलांमध्ये पाऊस झालेला आहे. मूर्तिजापूर तालुक्यात पावसाची नोंद झालेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com