Abdul Sattar Agrowon
ॲग्रो विशेष

Abdul Sattar : राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी द्या; अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Farmer Loan Waive : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना केली आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याच्या शेजारी असणाऱ्या तेलंगणा राज्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यानंतर राज्यातील शेतकरी, विविध शेतकरी संघटना आणि विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली जात आहे. मात्र यावर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया येताना दिसत नाही. याचदरम्यान राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीवरून वक्तव्य केलं आहे. सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी मंगळवारी (ता.१६) केली आहे. 

सत्तार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर बोलताना शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा मांडला. सत्तार यांनी यावेळी राज्यातील शेतकऱ्यांची ३ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी सरकारने करावी अशी मागणी केली. तसेच आपण याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी केल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलावं अशी, ही विनंती केल्याचे सत्तार म्हणाले. 

३० दिवसात कर्जमाफी द्यावी

त्याचबरोबर राज्य सरकारने मोदी-शाह यांच्याशी बोलून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तातडीने विचार करावा. शेतकऱ्यांना ३० दिवसात कर्जमाफी द्यावी, अशीही मागणी केल्याचे सत्तार म्हणाले. तसेच या कर्जमाफीसाठी केंद्रासह राज्याने काही वाटा उचलावा. याची सध्या पडताळीणी सुरू असून तशी माहिती गोळा केली जात आहे. सरकारची यथाशक्ती, सरकारचे उत्पन्न याचा विचार करून सरकारची कर्जमाफीबाबत ही सहानुभूतीची असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.  

तेलंगणात ४० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी

लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आश्वासना प्रमाणे मंजुरी देली. मुख्यमंत्री रेड्डी यांनी ३१ हजार कोटींच्या शेती कर्जमाफीला मंजुरी दिली. या घोषणेमुळे राज्यातील तब्बल ४० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर राज्यातील २ शेतकऱ्यांचे लाखांपर्यंतचे कर्ज १५ ऑगस्टपूर्वी माफ करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT