Pune News : शेतकऱ्यांना सरसकट वीजबिल व कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांच्या वतीने तहसीलदार रवींद्र सबनीस यांना सोमवारी (ता. ८) निवेदन देण्यात आले.
याबाबत पंधरा दिवसांनंतर तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असल्याचे अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद खांडगे पाटील यांनी सांगितले.
या निवेदनात राज्य सरकारने शेतकऱ्यांना ७.५ एचपीपर्यंत थकीत असलेली वीजबिल माफ करण्याची घोषणा केली, मात्र साडेसात एचपीच्या अधिक अधिभार वापरणारे शेतकरी नदी अथवा धरणांमधून भागीदारी पद्धतीने लिफ्ट करत असतात जेणेकरून त्यांना येणारे बिल विभागून भरता येते.
सरकारने ७.५ एचपी पेक्षाअधिक अधिभार वापरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. यामुळे सरसकट वीजबिल माफी देण्यात यावी तसेच नियमित वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजना लागू करावी. बिबटप्रवण क्षेत्रात दिवसा थ्री-फेज वीज मिळावी.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी शासनाने घोषित केल्याप्रमाणे सातबारा कोरा करावा. शेतीमालाला हमीभाव जाहीर करावा. मुलींना मोफत शिक्षणाच्या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करावी. खते औषधे व शेती अवजारे यावरील जीएसटी रद्द करावा.
गॅस,पेट्रोल व डिझेल यावरील किमती कमी कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर सह्याद्री शेतकरी संघटना, शिवनेरी शेतकरी संघटना, अखिल भारतीय शेतकरी संघटना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या सह्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.