Animal  Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Market : लाखमोलाचे पशुधन बाजारात

Animals for sale in the market : पाण्याअभावी बैलांबरोबरच दुभती जनावरे सुद्धा बाजारात विक्रीसाठी येत असल्याने जनावरांच्या किमती जवळपास २० ते २५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : गतवर्षी कमी पाऊस झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई जाणवत आहे. गावाबरोबरच शेतातही पाणी नसल्याने टंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. केवळ पाण्याअभावी बैलांबरोबरच दुभती जनावरे सुद्धा बाजारात विक्रीसाठी येत असल्याने जनावरांच्या किमती जवळपास २० ते २५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

या भागा रब्बीची पेरणी शेतकऱ्यांनी कशीबशी केली होती. कारण, पिकांना देण्यासाठी पाणी नव्हते. पण, दिवाळीनंतर या भागात सलग पाच दिवसांत जवळपास १२० मिलिमीटरच्या आसपास अवकाळी पाऊस झाला. यामुळे विहिरींना थोड्याफार प्रमाणावर पाणी आले, तसेच तळ्यातही थोडेफार पाणी साचले. त्यामुळे दिवाळीतच निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती दोन-तीन महिने पुढे ढकलली.

गहू, ज्वारी, हरभरा यासारखी रब्बीची पिके सुद्धा चांगल्या प्रमाणात आली. ‘अवकाळी’मुळे ज्वारीच्या पेरणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने सर्वत्र ज्वारी चांगल्या प्रमाणात आली. जनावरांना चारा मुबलक प्रमाणात तयार झाला. पण, फेब्रुवारीच्या शेवटी या भागात भीषण पाणीटंचाई जाणू लागली. गावात टँकर सुरू झाले.

पण, शेतात जनावरांना पिण्यासाठी पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असल्याने अनेकांनी पशुधनांना बाजाराची वाट दाखवायला सुरवात केली आहे. मार्च महिन्याच्या शेवटी गुढीपाडव्याच्या आसपास बैलं बाजारात सुद्धा तेजी असते, अनेक शेतकरी उन्हाळी कामे व पेरणीसाठी आत्ताच बैल खरेदी करतात. पण, यावर्षी पाणीच नसल्याने बैल जोड्या खरेदी करणे सुद्धा शेतकऱ्यांनी टाळल्यामुळे जनावरांच्या किमतीत जवळपास २० ते २५ टक्के घट झाल्याचे दिसून येत असून, बाजारात मंदीचे सावट दिसून येत आहे.

अशा आहेत किमती

७० ते ९० हजारांच्यादरम्यान विकली जाणारी बैलं जोडी सध्या ५० हजार ते ७० हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. तर ९० हजार रुपयांना विकली जाणारी गाय सध्या ७० हजार रुपयांना तर ७० हजारांची गाय ५० हजारांच्या आसपास विकली जात आहे.

यावर्षी पाणीटंचाई आहे. यामुळे शेतकरी जिवापाड जपलेली जनावरे बाजारात विक्रीस आणत आहेत. सध्या बाजारात मंदीचे सावट आहे.
दत्ता काळे, व्यापारी
यावर्षी शेतात पिण्यासाठी पाणीच नसल्यामुळे जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दूध देणारी जनावरे सुद्धा बाजारात आणून विकावी लागत आहेत.
संतोष शिंदे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT