Bajari Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी रखडली

Kharif Season : खानदेशात यंदा बाजरीची पेरणी अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. यातच पावसामुळे किंवा शेतात वाफसा नसल्याने पेरणी रखडली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा बाजरीची पेरणी अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. यातच पावसामुळे किंवा शेतात वाफसा नसल्याने पेरणी रखडली आहे. आगाप पेरणी यशस्वी झाली आहे. परंतु अनेक शेतकरी पेरणीसाठी अनुकूल वातावरणाची प्रतीक्षा करीत आहेत.

खानदेशात खरिपात बाजरीची पेरणी सुमारे सात ते आठ हजार हेक्टरवर केली जाते. बाजरीसाठी धुळे जिल्हा प्रसिद्ध आहे. धुळ्यातील शिंदखेडा, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा आदी भागातही खरिपातील बाजरी असते. तसेच तापी, गिरणा, अनेर, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्रातही काळ्या कसदार जमिनीत केळी व अन्य पिकांना बेवड, जमीन सुपीकता यासाठीदेखील अनेक शेतकरी बाजरी पेरतात.

धुळ्यात शिंदखेड्यातील बाजरी प्रसिद्ध आहे. काही शेतकऱ्यांनी जूनमध्ये आगाप पेरणी केली आहे. परंतु अनेकांनी पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे नियोजन केले होते. यात या महिन्यात सतत पाऊस सुरू आहे. यामुळे पेरणी किंवा पूर्वमशागतीसाठी वाफसाही तयार झाला नाही. यामुळे पेरणी रखडली आहे.

बाजरीचे दरही २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत टिकून आहेत. शिवाय कसदार चाराही यातून मिळतो. अलीकडे एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन देणारे बाजरी वाणही बाजारात आहेत. कमी खर्चात चांगले उत्पादन अनेक शेतकरी साध्य करतात. यामुळे शेतकरी बाजरीकडेही वळले आहेत.

आगाप पेरणी यशस्वी

अनेकांनी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात बाजरीची पेरणी केली आहे. ही पेरणी यशस्वी झाली आहे. कारण त्यावर पाऊस आला. तसेच एक वेळेस आंतरमशागतही पूर्ण करता आली. खतेही अनेकांनी दिली आहेत. यामुळे आगाप पेरणीची बाजरी सध्या जोम धरत आहे. खानदेशात आतापर्यंत सुमारे सहा हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे.

काही शेतकऱ्यांनी क्षेत्र केले कमी

काही शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी वाढविली नाही. काळ्या कसदार जमिनीत बाजरीऐवजी मका लागवडही अनेकांनी केली आहे. तर काहींनी सोयाबीनला पसंती दिली आहे. यामुळे बाजरीचे क्षेत्र खानदेशात यंदा वाढले नाही. क्षेत्र सात ते आठ हजार हेक्टरवर स्थिरावेल, असा अंदाज सुरुवातीपासून होता. पाऊसही यंदा वेळेत आला.

यामुळे सर्वच पिकांची पेरणी वेळेत झाली. यामुळेदेखील बाजरीचा पर्याय अनेकांनी निवडला नाही, अशीही स्थिती खानदेशात आहे. बाजरीची पेरणी खानदेशात चाळीसगाव, अमळनेर, शिंदखेडा आदी भागांत रखडली आहे. या भागातील पेरणी उघडीप मिळाल्यास पुढे होईल, अशीही माहिती शेतकऱ्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mukhyamantri Samruddha Panchayat Raj Abhiyan: समृद्ध पंचायतराज अभियानात २४४ गावांचा सहभाग

Jilha Bank Recruitment: ‘डीसीसी’त ७० टक्के स्थानिकांना नोकरीची संधी

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, जालना पोलिसात तक्रार दाखल, दोघे ताब्यात

French delegation visits Lasalgaon: लासलगाव बाजार समितीला फ्रान्सच्या शिष्टमंडळाची भेट

Agrowon Poscast: तुरीचे भाव दबावात; सोयाबीनचे दर सुधारले; कापूस व पेरूची आवक कमी; दोडक्याला उठाव

SCROLL FOR NEXT