Millet Cultivation : सकस चाऱ्यासाठी बाजरी, चवळी लागवड

Fodder Production : सकस चाऱ्यासाठी बाजरी आणि चवळीची लागवड फायदेशीर ठरते. या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे चांगले प्रमाण आहे. चाऱ्यासाठी बाजरीची जायंट बाजरा आणि चवळीच्या श्वेता, सी.४२१६, बुंदेल लोबिया, यू.पी.सी.५२८६ या जातींची निवड करावी.
Cow Pea
Cow PeaAgrowon

डॉ. लक्ष्मण तागड

Cow Pea and Bajari Farming : सकस चाऱ्यासाठी बाजरी आणि चवळीची लागवड फायदेशीर ठरते. या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे चांगले प्रमाण आहे. चाऱ्यासाठी बाजरीची जायंट बाजरा आणि चवळीच्या श्वेता, सी.४२१६, बुंदेल लोबिया, यू.पी.सी.५२८६ या जातींची निवड करावी.

बाजरी

हलक्या ते मध्यम जमिनीत घेतले जाणारे हे पीक आहे. विद्यापीठाने जायंट बाजरा या जातीची चाऱ्यासाठी शिफारस केली आहे. ही जात उंच वाढते. लुसलुशीत हिरव्या चाऱ्यात प्रथिनांचे प्रमाण ७ ते ९ टक्के असते.

Cow Pea
Millet Production : संशोधन, धोरणात्मक पाठिंबा तरी तृणधान्यात पीछेहाट

जून-जुलै महिन्यात ३० सेंमी अंतरावर पाभरीने पेरणी करावी. प्रति हेक्टरी दहा किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रती १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

हेक्टरी ९० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ३० किलो पालाश द्यावे. त्यापैकी ४५ किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ३० किलो पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित ४५ किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.

पीक पन्नास टक्के फुलोऱ्यात (पेरणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) असताना कापणी करावी.

हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ४५० ते ५०० क्विंटल उत्पादन मिळते.

Cow Pea
Fodder Production : चारा पिकांच्या क्षेत्रात तीन हजार हेक्टरने वाढ

चवळी

मध्यम ते भारी चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत जून ते ऑगस्ट या कालावधीत चवळीची लागवड करावी. या चाऱ्यामध्ये १३ ते १५ टक्के प्रथिने आहेत.

श्वेता, सी.४२१६, बुंदेल लोबिया, यु.पी.सी.५२८६, या जातींची ३० सेंमी अंतरावर पाभरीने पेरणी करावी.

पेरणीसाठी प्रती हेक्टरी ४० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

२० किलो नत्र व ४० किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे.

शेत तणविरहीत ठेऊन गरजेनुसार १५ दिवसांनी पाणी द्यावे.

पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी कापणी करावी. हिरव्या चाऱ्याचे २५० ते ३०० क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते.

डॉ. लक्ष्मण तागड, ९४०३३७६५५६

(अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com