Bajari Agrowon
ॲग्रो विशेष

Bajari Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी सुरू

Millet Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी सुरू झाली असून, यंदा क्षेत्र साडेसहा हजार हेक्टरवर स्थिर राहील, असे संकेत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात बाजरीची पेरणी सुरू झाली असून, यंदा क्षेत्र साडेसहा हजार हेक्टरवर स्थिर राहील, असे संकेत आहेत. बाजरीची सर्वाधिक पेरणी धुळे जिल्ह्यात होईल, असाही अंदाज आहे.

कमी कालावधी व कमी पाण्याचे पीक म्हणून बाजरीची ओळख आहे. मागील वर्षभरापासून बाजरीचे दरही टिकून आहेत. मागील सात ते आठ महिन्यांत बाजरीला सरासरी २१०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. खानदेशातील नंदुरबार, धुळ्यातील धुळे, दोंडाईचा (ता. शिंदखेडा),

शिरपूर, जळगावमधील चाळीसगाव, पाचोरा, चोपडा, अमळनेर या बाजार समित्यांत बाजरीला उठाव राहीला आहे. खरिपातही बाजरीची पेरणी बऱ्यापैकी झाली होती. ही पेरणी सुमारे १३ हजार हेक्टरवर झाली होती. धुळ्यातील शिंदखेडा तालुका बाजरीच्या उत्पादनात आघाडीवर आहे.

रब्बीत कमी पाऊसमान झाल्याने पेरणी घटेल, असा अंदाज होता. परंतु अनेक शेतकऱ्यांनी कांदा व इतर भाजीपाला पिकांची लागवड कमी करून किंवा लागवड टाळून बाजरी पेरणीचे नियोजन केले आहे. यात आगाप पेरणीला सुरुवात झाली असून, ही पेरणी धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा,यावल, चाळीसगाव भागांत अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

यंदा चाऱ्याची टंचाई असणार आहे. तसेच तृणधान्यासही उठाव आहे. यामुळे बाजरीतून नफा मिळेल व चाराही उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पेरणी अनेर, पांझरा, तापी, गिरणा आदी नद्यांच्या लाभक्षेत्रात दरवर्षी केली जाते. यंदा धुळ्यातील साक्री, धुळे, जळगावातील पारोळा, अमळनेर, बोदवड या भागात पेरणी वाढणार नाही. मागील हंगामात सर्वत्र पेरणी बऱ्यापैकी किंवा अपेक्षेएवढी झाली होती.

पेरणी पुढे जानेवारीच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. पेरणीसाठी शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या वाणाची निवड करीत आहेत. तसेच काही शेतकरी बारीक दाणे व चमकदारपणा असणाऱ्या बाजरीची पेरणी करीत आहेत.

काढणी पूर्ण झालेल्या केळी बागांतही पेरणी

खानदेशात कांदेबाग केळीतील काढणी ९५ ते ९७ टक्के पूर्ण झाली आहे. या बागांमध्ये किरकोळ आंतरमशागत करून केळी बागेसाठी टाकलेल्या ठिबकचा उपयोग बाजरीच्या सिंचनासाठी केला जात आहे. केळीच्या बेवडमध्ये बाजरी जोमात येते, असे खानदेशातील केळी उत्पादक मानतात.

तसेच बाजरीचे बेवड जमीन सुपीकतेसाठी उपयुक्त असते. यामुळे काढणी पूर्ण झालेल्या केळी बागांमध्ये बाजरीची पेरणी सुरू आहे. ही पेरणी जळगाव, जामनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर भागात अनेक शेतकऱ्यांनी केल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT