Mahad News : आपल्या शेतामध्ये अन्नधान्य पिकविण्यासाठी जिथे शेतकऱ्याला मोठा संघर्ष करावा लागतो, अशा परिस्थितीमध्ये निसर्गरम्य भिवघर गावातील एका पक्षिप्रेमी शेतकऱ्याने पक्ष्यांसाठी आपल्या शेतामध्ये बाजरी लावली आहे. या बाजरीचे कणसाचे दाणे खाण्यासाठी पक्ष्यांचे थवे या गावांमध्ये लोटत आहे.
महाड तालुक्यातील भिवघर हे गाव वनप्रेमींचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील तरुण किशोर पवार यांनी वनप्रेमी संस्थेच्या माध्यमातून पक्षिप्रेमी व ग्रामस्थांना एकत्रित करत वणवा मुक्तीची चळवळ गावामध्ये यशस्वी केल्याने या गावातील वनसंपदा वणवामुक्त झाली आहे. गावातील वृक्ष तोड थांबल्याने जंगलाची वाढ होऊ लागली आहे.
त्यामुळे गावामध्ये जंगलातील विविध प्राणी, पशू-पक्षी तसेच जैवविविधतेचे दर्शन घडत आहे. उन्हाळ्यामध्ये या पशू-पक्ष्यांना पिण्याचे पाणी कमी पडू नये, याकरिता दानशूर व्यक्तींमार्फत टँकरच्या माध्यमातून जंगलामध्ये पशू-पक्ष्यांना पाण्याची सोय केली जाते.
या गावातील पक्षिप्रेमी नरेश बाबाजी गुडेकर यांनी डोंगराळ भागामध्ये वीस गुंठे क्षेत्रामध्ये पक्ष्यांसाठी बाजरीचे पीक घेतले आहे. जंगलातील पक्षी व पाखरे भात पिकापेक्षा ज्वारी-बाजरीच्या पिकावर अधिक प्रमाणात येत असतात.
त्यामुळे त्यांनी बाजरीचे वेगळे पीक घेण्याचा निर्णय घेतला. खास पक्ष्यांसाठी त्यांनी बाजरीची कणसे मोकळी सोडली आहेत. नरेश यांनी आपले संपूर्ण शेत पक्ष्यांसाठी खुले केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.