Milk Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दूध संघाकडून दुधाला ३० रुपये दर देण्यास नकार

Milk Rate Issue : शेतकरी संघटना व दूध उत्पादक शेतकरी यांनी जिल्ह्यात केलेल्या आंदोलनामुळे शासनाने तीस रुपये दर देण्याचे जाहीर केले.

Team Agrowon

Nagar News : शेतकरी संघटना व दूध उत्पादक शेतकरी यांनी जिल्ह्यात केलेल्या आंदोलनामुळे शासनाने तीस रुपये दर देण्याचे जाहीर केले. मात्र जिल्ह्यातील काही दूधसंघाने तीस रुपये दर देण्याची असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा दुग्धविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल औताडे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, पशुवैद्यकीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, प्रभाकर कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दुधाला दर मिळावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत.

शेतकरी संघटनेने यासाठी आंदोलन केले. शासनाने पाच जुलैला काढलेल्या अध्यादेशानुसार ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गुणप्रतीच्या दुधाला तीस रुपये प्रति लिटर दर देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाच रुपये प्रति लिटर अनुदान देणार आहेत. त्याचप्रमाणे फॅटसाठी वाढलेल्या प्रत्येक पॉइंटला ३० पैसे वाढ व घटलेल्या प्रत्येक पॉइंटला ३० पैसे कमी करण्याबाबत सूचित केले आहे.

सर्व खासगी व सहकारी दूध संघांनी १ जुलै २०२४ पासून अंमलबजावणी होणार आहे. परंतु श्रीरामपूर येथील सनफ्रेश ॲग्रो लिमिटेडने जुन्याच दराने म्हणजे २७ रुपये प्रती लिटरने शेतकऱ्यांना पैसे दिल्याचा प्रकार गुरुवारी उघड झालेला आहे. या संघाने ११ जानेवारी २०२४ ते १० मार्च २०२४ साठी संकलन केलेल्या दुधाला शासनाने प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले होते.

सदर अनुदानाबाबत केंद्र चालकांनी व काही दूध शीतकरण केंद्र चालकांनी अनुदानासाठी सर्व माहिती ई-मेलद्वारे अपलोड करूनही सनफ्रेश ॲग्रो लिमिटेडने जिल्हा दुग्धविकास अधिकाऱ्याकडे माहिती दिली नसल्याने पात्र शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आल्याचा संघटनेचा आरोप आहे.

सदर अनुदान मिळण्यासाठी संबंधित अधिकारी यंत्रणा यांना जबाबदार धरून त्यांच्याकडे व्यक्तिगत स्वरूपात कारवाया करून वसूल करावी अथवा दुग्ध विकास विभागाने माहिती अपलोड करण्यासाठी मुदत वाढवावी असेही तक्रारीत संघटनेने म्हटले आहे.

दूध डेअरी संकलन केंद्र, खासगी दूध संघ अथवा कंपन्या सहकारी दूधसंघ यांच्याकडून पाच जुलैच्या शासन निर्णयाप्रमाणे गाईच्या दुधाला ३० रुपये प्रति लिटर दर मिळावा. जे संघ दर देणार नाहीत अशा संस्था, संकलन केंद्रांवर जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा शेतकरी संघटना जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांच्यासह संबंधित दूध संघ व संकलन केंद्र यांच्यावर तीन ते चार रुपये प्रति लिटरचा लुटमारीचा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करू.
- अॅड. अजित काळे, प्रदेश उपाध्यक्ष, शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT